युवा स्वयंसेवक व युवक मंडळानी 5 डिसेंबर पूर्वी प्रस्ताव दाखल करावेत

 

युवा स्वयंसेवक व युवक मंडळानी

5 डिसेंबर पूर्वी प्रस्ताव दाखल करावेत

 

लातूर, दि.23 (जिमाका):-क्लिन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवक व युवक मंडळानी  स्पर्धेसाठी आपण केलेल्या कार्याच्या पुराव्यासहीत दिनांक 05 डिसेंबर 2021 पूर्वी आपले प्रस्ताव नेहरु युवा केंद्र लातूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत लातूर येथे दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैया यांनी केले आहेत.

केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार मार्फत प्राप्त निर्देशाप्रमाणे नेहरु युवा केंद्र लातूर मार्फत दिनांक 02 ते 28 ऑक्टोबर 2021 या कालावधीत जिल्ह्याभरात क्लिन इंडिया कार्यक्रमाचे आायेजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातर्गत प्रत्येक गावात प्लास्टीक व अन्य कचरा गोळा करुन त्याची रितसर विल्हेवाट लावणे, गावात स्वच्छतेविषयी जनजागृती करणे, वृक्षारोपण, चर्चासत्र व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

क्लिन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्यांची जिल्हापातळीवर निवड करण्यात येऊन त्यांचा योग्य तो सन्मान करण्यात येणार आहे. तसेच जिल्हापातळीवर प्रथम स्थानी साठी निवड झालेले युवक / मंडळ राज्यपातळीवरील स्पर्धेसाठी पात्र ठरतील तसेच राज्य पातळीवर प्रथम स्थानी निवड झालेले मंडळ राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी पात्र ठरेल, अधिक माहितीसाठी 02382-295598 या क्रमांकावर संपर्क साधावा.

                                                      ***

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु