अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी जळकोट,देवणी,चाकूर व शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रमाबाबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे साधला संवाद
अप्पर जिल्हाधिकारी
अरविंद लोखंडे यांनी जळकोट,देवणी,चाकूर व शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीचा
निवडणूक कार्यक्रमाबाबत व्हिडीओ
कॉन्फरसिंगद्वारे साधला संवाद
लातूर,दि.29 (जिमाका):- जिल्ह्यातील जळकोट, देवणी, चाकूर व शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीचा
निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून या निवडणुक कामाविषयक केलेल्या कार्यवाहीचा व पुढील नियोजनाबाबत प्रभारी
जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी व्हीडीओ कॉन्फरसिंगव्दारे आढावा घेण्यात आला.
या बैठकीस अतिरिक्त पोलीस अधिक्षक अनुराग जैन,निवडणूक
निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जळकोट प्रविण मेंगशेट्टी, प्रविण फुलारी,चाकूर श्रीमती शोभादेवी जाधव, देवणी, अविनाश कांबळे, शिरूर
अनंतपाळ व तसेच जळकोट, देवणी, चाकूर व
शिरूर अनंतपाळ तालूक्याचे संबंधित तहसीलदार व संबंधित मुख्याधिकारी व सहाय्यक
पोलीस निरीक्षक श्री. सावंत, नगर पंचायत क्षेत्रातील पोलीस
अधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी युवराज
पाटील हे उपस्थित होते.
या वेळी
प्रभारी जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी जिल्ह्यातील चारही नगरपंचायतीचा
निवडणुक कार्यक्रम जाहीर केल्याप्रमाणे या निवडणूक कामात कोणत्याही प्रकारची हयगय करण्यात येवू नये असे निर्देश दिले. उमेदवारीसाठी ऑनलाईन
फॉर्म भरणे याबाबत सर्व संबंधिताची एक बैठक घेवून प्रशिक्षण देण्यात यावे. सर्व उपविभागीय अधिकारी यांनी
निवडणूक संदर्भातील सर्व जात प्रमाणपत्र प्रकरणाची तात्काळ प्रकरणे निकाली काढावीत. राजकीय पक्षाची बैठक आयोजीत करून एबी फॉर्मबाबत आवश्यक त्या
सूचना देण्यात याव्यात. उमेदवारी
मागे घेताना उमेदवारावर दडपण टाकणे अशा प्रकार टाळण्यासाठी व्हिडीओ कॅमे-यामध्ये रेकॉडींग करून घ्यावे. मतमोजणी ठिकाणी गर्दी होवू नये यांची दक्षता घेण्यात यावी. स्ट्रॉग रूम ची व्यवस्थीत पाहणी करून घेणे इत्यादी कामे
तात्काळ करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले. निवडणूकीचे सर्व कामे
करताना सध्यस्थितीत कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना
करण्याबाबतचे निर्देश यावेळी देण्यात आले.
या वेळी जिल्हा
सह आयुक्त सतिश शिवणे यांनी जिल्हयातील
चारही
नगरपंचायतीच्या निवडणूक कामाची टप्पेनिहाय
चर्चा केली. व सर्व उपविभागीय अधिकारी
तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी चर्चा करून निवडणूक कामी येणा-या अडी-अडचणी
तात्काळ सोडविण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
तसेच निवडणूक कामी
कायदा व सुव्यवस्था राखणे करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनासह आर्थिक बळाचा
दुरूपयोग टाळणे, मतदारावर प्रभाव टाकण्याकरीता देण्यात आलेल्या वस्तुच्या,मद्य वाटप यावर
अकुंश ठेवणे, रोख रक्कमांच्या व्यवहारावर सर्व संबंधित ठिकाणी नजर ठेवणे याबाबत पोलीस
प्रशासनाकडून व इतर विभागाकडून सहकार्य करावे. अतिरिक्त पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांनी पोलीस
प्रशासनाकडून वेळेत योग्य ती कार्यवाही करण्यात येत येईल असेही सांगितले.
शेवटी प्रभारी जिल्हाधिकारी अरविंद
लोखंडे यांनी निवडणूक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावित व निवडणूक कामी येणा-या तक्रारीचे
निराकरण वेळेत करण्यात यावे, असेही निर्देश देण्यात आले.
***
Comments
Post a Comment