रस्त्याचे काम दर्जेदार, जलदगतीने कालमर्यादेत रस्ता देखभाल दुरुस्ती करावीत --- पालकमंत्री अमित देशमुख

 

रस्त्याचे काम दर्जेदार, जलदगतीने कालमर्यादेत

रस्ता देखभाल दुरुस्ती करावीत

--- पालकमंत्री अमित देशमुख

 

§  अहिल्यादेवी होळकर चौक ते जिवाजी महाले चौक (गरुड चौक) रिंग रोड डांबरीकरण कामाचा शुभारंभ

§  अग्निशमन दलाच्या अद्ययावत वाहनाचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

§  मनपाने लातूरकरांसाठी आठवणीत राहण्या योग्य अशी नाविण्यपूर्ण योजना राबवावी

§  वॉटर ग्रीड या योजनेचा पहिला टप्पा औरंगाबाद, बीड, लातूर मराठवाड्यातल्या या तीन जिल्ह्यातून होणार

 


लातूर,दि.3 (जिमाका):- रस्त्याचे काम दर्जेदार, जलदगतीने कालमर्यादेत रस्ता देखाभाल दुरुस्ती करण्यात यावी, जेणेकरुन लातूरकरांना या सुविधेचा बराच काळ उपयोग करता येईल, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य  मंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री  अमित देशमुख यांनी प्रतिपादन केले.

लातूर महानगरपालिकेच्यावतीने अहिल्यादेवी होळकर चौक ते जिवाजी महाले चौक ( गरुड चौक) रिंग रोड या रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या शुभारंभाप्रसंगी पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते.

या कार्यक्रमास लातूर महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे,  मनपा आयुक्त अमन मित्तल, ज्येष्ठ नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, विरोधी पक्ष नेते ॲङ दिपक सूळ, ॲङ किरण जाधव, नगरसेविका सपना किसवे आदि मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.


पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, लातूर शहराचा भव्य वळण रस्ता तो गेल्या बऱ्याच दिवसांपासून खराब व नादुरुस्त स्थितीत होता.
लातूर महानगरपालिकेच्यावतीने अहिल्यादेवी होळकर चौक ते जिवाजी महाले चौक ( गरुड चौक) रिंग रोड या रस्त्याचा नूतनीकरण आपल्या सगळ्यांच्या साक्षीला याठिकाणी संपन्न होत आहे. त्याबद्दल महानगरपालिकेचे आभार व्यक्त केले.  

या परिसरातल्या नागरिकांसाठी अतिशय सोयीचा हा रस्ता असेल, यांची खात्रीही दिली. साडेतीन कोटी रुपये रस्त्यांसाठी लातूर शहर महानगरपालिकेला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले आहेत. यावर्षी पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या परिसरामध्ये झाला अतिवृष्टी पूर परिस्थितीलादेखील आपल्याला सामोरे जावे लागले म्हणून या कामाला स्थगिती दिली हाती. तर एवढ्या मोठ्या पावसामध्ये असे काम करणं हे संयुक्तिक नव्हतं आणि म्हणून पावसाळा झाल्यानंतर या कामाला आपण सुरुवात करावी असं ठरलं. आज तो दिवस उजाडलेला आहे. लातूरकरांनी कोरोनाच्याही परिस्थितीचाही सामना करीत असतांना लातूरमध्ये सामान्य माणसाला विकासापासून वंचित राहू दिले जाणार नाही. तसेच पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य, दिवाबत्ती, रस्ते अशी सर्व कामं मनपाने नियमितपणे पार पडलेली आहेत. तसेच लातूरकरांनी लातूरच्या संस्कृतीची जोपासना अधिक चांगल्या पध्दतीने करीत असते. शहरांमध्ये अनेक उद्योग, व्यापार, व्यवसाय, वाण्यज्य या क्षेत्रातही भरारी घेत आहे.

वितरण व्यवस्था सक्षम होईल तेव्हांच आदरणीय कै. विलासराव देशमुख साहेबांचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने आपण पाऊल टाकत आहोत. एवढेच नव्हे तर वॉटर ग्रीड या योजनेचा पहिला टप्पा औरंगाबाद, बीड, लातूर मराठवाड्यातल्या या तीन जिल्ह्यातून होणार आहे. तसेच नळाद्वारे पिण्याचे पाणी प्रत्येकाला प्रतिदिन मिळाले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आता ही मनपाने पावले उचलण्यास आपण सुरुवात केलेली आहे. मनपा आयुक्तांनी आता मूर्त स्वरूप या योजनेला देण्याची वेळ आलेली आहे. एखादी केंद्राची योजना जिल्ह्यात राबविण्यासाठी सुनियोजि आराखडा तयार करुन लातूरला कायम आठवणीत राहील,अशी योजना मनपा आयुक्तांनी लातूरमध्ये राबविण्याचीही अपेक्षा पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली.

अतिवृष्टी पूर परिस्थितीमध्ये चारशे कोटी रुपये शासनाने मंजूर केले असून  शासन आणि खऱ्या अर्थानं अडचणीच्या काळामध्ये सामान्य माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे यांनी केलं आहे, असेही पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले.

तसेच महाराष्ट्रातील लोककलावंतांना कोरोना काळामध्ये यांचे नुकसान झाले. लाककलावंतना  फुल ना फुलाची पाकळी मदतीचा हात म्हणून 35 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याचे वाटप दिवाळीनंतर सुरू होईल. लातूरकरांना आठ दिवसाएैवजी चार दिवसाला पिण्याचे पाणीदेखील निर्णय घेण्यात आलेला आहे.

अग्निशमन दलाच्या अद्ययावत वाहनाचे

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

 


लातूर शहर वाढत असून शहरीकरणाचेही जाळे वाढत आहे. अशा परिस्थितीत इमारतींमध्ये उचींच्या ठिकाणी आगीच्या घटना अथवा आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होवू नये म्हणून बचावकार्य वेळेत केलं जावं. जिवित हानी झाली नाही होऊ नये, यासाठी त्यावर उपायोजना म्हणून लातूरसाठी अद्ययावत अशा अग्निशमन वाहनाचा लोकार्पण पालकमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. तसेच बचावादरम्यान अग्निशमन विभागातील उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी / कर्मचारी यांची सत्कार करुन कौतुकही करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लातूर महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले, तर आभार नगरसेविका सपना किसवे मानले.

0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु