विशेष पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत आपले नाव मतदार म्हणून नोंदविता येणार

 

विशेष पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत

आपले नाव मतदार म्हणून नोंदविता येणार

 

लातूर,दि.12 (जिमाका):- निवडणूक आयोग, नवी दिल्ली व मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई यांचे निर्देशानुसार दि. 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला असून त्यानुसार दि. 01 नोव्हेंबर 2021 ते दिनांक 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मतदार नोंदणी प्रभावीपणे होण्यासाठी दि. 13 व 14 नोव्हेंबर आणि दि. 27 व 28 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत असुन या विशेष मोहिमेच्या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) BLO पुर्ण वेळ मतदान केंद्रावर हजर राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सांगितले.

लातूर तालुक्यातील सर्व नागरीकांना / मतदारांना आवाहन करण्यात येते की, ज्यांचे नाव मतदार यादीत नाहीत व ज्यांचे वय दि.10 जानेवारी 2022 रोजी 18 किंवा त्यापेक्षा अधिक आहे, त्यांनी दि. 01 नोव्हेंबर, 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत व दि. 13 व 14 नोव्हेंबर,2021 आणि दि. 27 व 28 नोव्हेंबर 2021 या विशेष मोहिमेच्या कालावधीत आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. तसेच ज्या मतदारांचे नाव दुरुस्ती करावयाचे आहे. किंवा ठिकाण / पत्ता बदलावयाचे आहे तसेच मयत व कायम स्थलांतरीत झाल्यामुळे मतदार यादीतील नावाची वगळणी करावयाचे आहे त्यांनी योग्य तो नमुना अर्ज ऑनलाईन स्वरुपात www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा Voter Helpline App  च्या माध्यमातून अर्ज करावे. तसेच अपवादात्मक परिस्थीतील वरील सर्व अर्ज हस्तलिखित स्वरुपात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) (BLO) यांचे मार्फतसुध्दा स्विकारले जातील.

मतदारांनी / नागरीकांनी पूढीलप्रमाणे योग्य तो नमुना अर्ज सादर करावा. ज्यांचे नाव मतदार यादीत नाहीत व ज्यांचे वय दि.10 जानेवारी 2022 रोजी 18 किंवा त्यापेक्षा अधिक आहे अर्ज नमुना नं.6, अर्जदाराचा रंगीन फोटो, जन्म तारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा. मयत किंवा कायम स्थलांतरीत असल्यास- अर्ज नमुना नं.-7, मयत- मृत्यू प्रमाणपत्र, स्थलांतरीत- सद्या राहत असलेल्या वास्तव्याचा पुरावा.मतदार यादीतील तपशीलात दुरुस्ती, अर्ज नमुना नं.-8, ज्या तपशीलात दुरुस्ती करावयाची आहे, त्यासंबंधीचा पुरावा.विधानसभा मतदार संघाअंतर्गत ठिकाण / पत्ता बदल, अर्ज नमुना नं. 8-अ, अर्जदाराचा रंगीन फोटो, रहिवासी पुरावा.

कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव व मतदार यादीतील त्रूटी टाळून अर्जाचे संगणीकरण सोयीचे होण्यासाठी मतदार नोंदणी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास भार निवडणूक आयोगाचे www.nvsp.in हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline App मध्ये सुविधा उपलब्ध्‍ करुन दिलेल्या आहे. सदर सुविधांचा जास्तीत जास्त व प्रभावीपणे वापर करुन ऑनलाईन अर्ज करुन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सुनील यादव, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी औसा-रेणापूर अविनाश कांबळे व तहसिलदार तथा सहा.मतदार नोंदणी अधिकारी स्वप्नील पवार यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी www.nvsp.in / https://ceo.maharashtra.gov.in / Voter Helpline App या संकेतस्थळावर भेट घ्यावी.

                                                   ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा