शेतकऱी अन्नदात्यासोबतच,ऊर्जादाता म्हणून नावारुपास येण्याचा प्रयत्न करावा - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
शेतकऱी अन्नदात्यासोबतच,ऊर्जादाता म्हणून
नावारुपास
येण्याचा प्रयत्न करावा
-केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग
मंत्री नितीन गडकरी
लातूर,दि.26(जिमाका):- जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी इथेनॉल आणि बायो ऊर्जा देणारे पिके घ्यावीत त्यातून मोठ्या प्रमाणात इंधनाची गरज पूर्ण होईल, आणि आतापर्यंत अन्नदाता असणारा शेतकरी आता ऊर्जादाताही होवू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
केंद्रीय रस्ते वाहतूक व राज्य मार्ग मंत्रालय नवी दिल्ली भारत सरकार यांच्या आर्थिक सहकार्यातून व फिनिक्स फाउंडेशन संस्था लातूर आणि कमर्शियल व्हेईकल लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने देशातील पहिले खाजगी सार्वजनिक भागीदारीतून पीपीपी निर्मित आयशर वाहन चालक प्रशिक्षण व संशोधन संस्थेचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोदगा ता. जि.लातूर येथील फिनिक्स महाविद्यालयाच्या प्रागणात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास राज्यमंत्री संजय बनसोडे कमर्शियल वेहिकल लिमिटेड उपाध्यक्ष जे.पी. वर्मा, उस्मानाबाद खासदार ओमराजे निबांलकर, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, खासदार सुधाकर श्रृंगारे,आमदार अभिमन्यू पवार, विधान परिषद सदस्य रमेशअप्पा कराड,आमदार विक्रम काळे,माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर,माजी खा. सुनील गायकवाड, माजी आ.सुधाकर भालेराव, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आज आपल्या देशामध्ये 22 लाख ड्रायव्हरची आवश्यकता आहे. विशेषतः युरोपियन देशांमध्ये अशी पद्धती आहे, आठ तासांपेक्षा जास्त वेळ वाहन चालवतो, तेव्हा आठ तासांच्या तिथे मशीन असते, ड्रायव्हर उतरून जातो. पण आपल्याकडे चालक हे सातत्याने काम करत असतात. आपल्याकडे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये टेंपरेचर 48 डिग्री असताना वाहन चालवित असतात. आपण याकडे लक्ष न दिल्यामुळे आपल्या देशात रस्त्यावरील अपघात ही गंभीर समस्या बनत आहे. दरवर्षी पाच लाख अपघात होतात, दीड लाख लोकांचा मृत्यू होतो, पाच लाखांवर गंभीर जखमी होतात आणि देशात प्रत्येक तासाला 415 अपघाती मृत्यू, तर त्यापैकी 70 टक्के मृत्यू होणे हे 18 ते 25 वयोगटातील तरुण युवक युवती याच्यांमध्ये आहे. वाहन चालकांनी रस्त्याचे नियम पाळले पाहिजेत. तुमच्या मोबाईलमध्ये आपल्या वाहनाची कागदपत्रे राहतील, अशी सोय आता आपल्याला उपलब्ध झालेली आहे.
देशातले पहिले फिलिप्स आयशर इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग ॲण्ड रिसर्च इंडिया आयडीटीआर लातूर जिल्ह्यामध्ये होत आहे. हे सेंटर नक्कीच मराठवाड्यातील अनेक युवकांना रोजगार उपलब्ध होईल असा मला विश्वास असून शेतकऱ्यांनी अन्नदात्यासोबतच, ऊर्जादाता म्हणून नावारुपास येण्याचा प्रयत्न करावा.
प्राथमिक
शाळा माध्यमिक शाळांमधून रोड सेफ्टीच्या एज्युकेशनला महत्व देणे आवश्यक आहे. या सेंटरमध्ये
एकीकडे विशेषता ड्रायव्हिंग ट्रेनिंगच्या बरोबर रोड सेफ्टीच्या कामाला नक्कीच या सेंटरमधून
ट्रेनिंग मिळेल असा विश्वासाने सांगितले. लोकप्रतिनिधींनी
सडक सुरक्षा, जीवन सुरक्षा आपल्या मतदार क्षेत्रामध्ये विशेष रूपाने मोहिम राबविण्याचाही
प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
प्रत्येक
जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये बेरोजगारीची समस्या आहे. ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर
आवश्यक आहे. आदिवासी, ग्रामीण भागामध्ये आपण
ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलची सुरुवात करण्याबाबतही विचार करण्याचा सल्ला दिला. भारत
सरकारने त्यांना मदत केली आहे भारत सरकारकडून 17 कोटी रुपये आर्थिक अनुदान दिले आहे.
लातूर जिल्हा शिक्षणाच्या बाबतीमध्ये अग्रेसर आहे. शेतकऱ्यांनी वातावरण पाहून आपल्या शेतीचा खरा पॅटर्न निर्माण केला पाहिजे.
आपण खाद्य तेल आयात करत असतो, भुईमूग सोयाबीन, जवस, सरकी या तेलाची कमी आणि म्हणून
तेलाचे उत्पादन वाढून आपल्याला आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे. शेतकऱ्याला आता इथेनॉलचे
उत्पादन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. शेतकरी सुखी व्हावा, समृद्ध
व संपन्न व्हावा आणि मी ते स्वप्न बघतो आहे.
राज्यमंत्री
संजय बनसोडे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, पाशा पटेल यांनी जिल्ह्यात कल्पकतेने आपल्या अभ्यासातून त्यांची
ओळख निर्माण केलेली आहे. त्यांनी आयोगाच्या माध्यामातून महाराष्ट्राला तसेच महाराष्ट्राला
महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
यावेळी
परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे म्हणाले की, या
संस्थेतून चांगले वाहन चालक तयार व्हावेत. बाहेरच्या नागरिकांना वाहन चालक म्हणून कामाकरिता
आपल्या राज्यात आणावे लागते, या संस्थेतून उत्तम वाहन चालक निर्माण होतील व त्यांना
आपल्याच जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होणार आहे, अपेक्षा व्यक्त करुन संस्थेस शुभेच्छा
दिल्या. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी तसेच प्रशिक्षणार्थी वाहन चालक या पंचकृषीतील
नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000
Comments
Post a Comment