आरोग्य विभागा अंतर्गत सक्रीय क्षयरुग्ण् मोहिमेस सहकार्य करावे -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
आरोग्य
विभागा अंतर्गत सक्रीय क्षयरुग्ण् मोहिमेस सहकार्य करावे
-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
लातूर,दि.15 (जिमाका)- क्षयरोगाबाबत
जनसामान्यामध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागामार्फत क्षयरुग्ण्
शोध मोहिम पहिली फेरी दि. 15 ते 25 नोव्हेंबर 2021 व दुसरी फेरी दि. 13 ते 23 डिसेंबर
2021 या कालावधीत राबविण्यता येणार आहे. या मोहिमेअंतर्गत नागरीकांनी आपल्या घरी येणाऱ्या
प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी व स्वयंसेकाकडून आरोग्य तपासणी करुन घ्यावी आणि त्यांना
सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले.
जिल्हाधिकारी
कार्यालय सभागृहात सक्रीय क्षयरोग शोध मोहिम समन्वय समिती बैठकीत ते बोलत होते. या
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त अमन मित्तल, जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.एस.एस.
फुलारी, सर्व वैद्यकीय अधिक्षक, सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
शहरी व ग्रामीण भागातील जोखमीच्या ठिकाणी तयार केलेल्या कृती आराखडयाव्दारे
आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, क्षेत्रीय स्तरावरील आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक
यांचे पथकाव्दारे दररोज 40 ते 50 घरांना गृहभेट देवून क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना
शोधणे, त्यांची थुंकी नमुने तपासणी, एक्स-रे तपासणी आवश्यकतेनुसार सीबीनॅट तपासणी व
इतर तपासणी करुन क्षयरोगाचे निदान करणे व क्षयरोग औषधोपचारावर आणणे होय,सक्रीय क्षयरुग्ण्
शोध मोहिम जिल्हयात प्रभावीपणे राबविण्याकरीता तसेच जास्तीत जास्त जनतेने क्षयरोगाबाबत
तपासणी करुन घ्यावी.
****
Comments
Post a Comment