जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने जिवन रेखा व्यसन मुक्ती केंद्र, लातूर येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर यशस्वीरित्या संपन्न

 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने

जिवन रेखा व्यसन मुक्ती केंद्र, लातूर येथे कायदेविषयक

जनजागृती शिबीर यशस्वीरित्या संपन्न

 

           लातूर,दि.11 (जिमाका):-    जिवन रेखा व्यसन मुक्ती केंद्र,लातूर येथे कायदेविषयक जनजागृती शिबीराच्या माध्यमातून कायदेविषयक जनजागृती करण्यात आली.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन जाधव संतोश हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे व प्रमुख वक्ते म्हणून पॅनल अॅड. छाया मलवाडे आणि विधीस्वयंसेवीका सौ. पार्वती सोमवंशी या उपस्थित होत्या.

                 या शिबीरामध्ये पॅनल अॅड. छाया मलवाडे यांनी संपत्तीचा अधिकार, कौटुंबिक अधिकार, भारतीय दंड संहितेच्या तरतुदी, विधी सेवा प्राधिकरणच्या कार्याबद्दल माहिती व व्यसनमुक्ती समुपदेशन इ. विषयी माहिती दिली. तसेच विधीस्वयंसेवीका सौ. पार्वती सोमवंषी यांनी व्यसनमुक्ती समुपदेशन तसेच त्या संबंधीत शासकिय योजना, सेंद्रिय शेती,जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध योजना आणि सोयाबिन प्रक्रिया उद्योग व शेतकरी गटाच्या योजना या विषयांवर सविस्तर अशी माहिती समस्त गावकऱ्यांना दिली.

                 कार्यक्रमाची प्रस्तावना व सुत्रसंचालन साखरे एन.व्ही. यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हलाळे सर यांनी केले. सदरील कार्यक्रमास जिवन रेखा व्यसन मुक्ती केंद्र, लातूर येथील पिडीत लोक  उपस्थित होते.

                 तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर येथील पॅनल अॅडव्होकेट आणि जिवन रेखा व्यसन मुक्ती केंद्र, लातूर येथील कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला. 

 

                                                           



                

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु