परमिट प्राप्त शेतक-यांनी अनुदानावरील हरभरा व ज्वारी बियाणांची उचल करावी -- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे आवाहन

 

परमिट प्राप्त शेतक-यांनी अनुदानावरील

हरभरा व ज्वारी बियाणांची उचल करावी

-- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे आवाहन  

           लातूर,दि.11 (जिमाका):-   शासनाच्या बियाणे वितरणाकरिता महाडीबीटी पोर्टलवर राष्ट्रीय  अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत तसेच ग्रामबिजोत्पादन अंतर्गत हरभरा ज्वारी दहा वर्षाआतील दहा वर्षावरील प्रमाणित बियाणे वितरणासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी अनुदानावरील बियाणे उचल करण्यासाठी तालुका कृषि अधिकारी  यांनी आनलाईन ऑफ़लाईन निवड झालेल्या शेतकऱ्यांना परमिट दिलेले  आहेत.

        सदर परमिटव्दारे शेतकऱ्यांनी 11 नोव्हेंबरपर्यत अनुदानावरिल  हरभरा ज्वारी उचल करावी.                11 नोव्हेंबर नंतर सदरचे परमिट बाद होणार आहे. त्यानंतर परमिटधारक नलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानित प्रमाणित बियाणे वितरणाचे बियाणे मिळाले नाही, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी शेतकऱ्यांची राहील. तसेच  त्याबाबत कुठलीही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार  नाही. त्यानंतर हरभरा ज्वारी दहा वर्षाआतील दहा वर्षाच्यावरिल अनुदानावरील सर्व प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांसाठी सुरु होणार आहे.

        शेतकऱ्यांच्या सातबारावरील क्षेत्रानुसार 0.40 आर पासून ते जास्तीत - जास्त 2.00 हेक्टरपर्यंत क्षेत्रासाठी प्रमाणित बियाणे वितरणाअंतर्गत  अनुदानावर मिळणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी, महाबीज वितरक, एन.एस.सी. वितरक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ,लातुर यांनी केले आहे .

 

                                                        ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु