मतदार नोंदणी जनजागृती साठी सायकल रॅलीचे आयोजन

 

मतदार नोंदणी जनजागृती साठी

 सायकल रॅलीचे आयोजन

 

लातूर,दि.1(जिमाका):- मा.भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली व मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई यांचे निर्देशानुसार दि. 01 जानेवारी 2022 या अहर्ता दिनांकावर केलेला असुन त्यानुसार दिन. 01 ते दि. 30 नोव्हेबर 2021 या कालावधीत दावे व हरकती स्विकारणार आहे. या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाची व्यापक स्वरुपात जनजागृती करुन अधिक-अधिक मतदार नोंदणी करणे व मतदार नोंदणीपासुन कोणीही वंचित राहु नये, यासाठी दि. 30 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 7 वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते.

या रॅलीत मतदार जनजागृती संबंधी चित्ररथ सुध्दा तयार करण्यात आला होता. या सायकल रॅली व चित्ररथ याची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचे हस्ते हीरवा झेंडा दाखवुन सुरुवात होऊन लातूर शहरातील वेगवेगळया भागातुन 23 की.मी. चा प्रवास तब्बल दोन तास तेरा मिनिटे करुन समारोप दयानंद महाविद्यालय परिसर, लातूर येथे झाला.

या रॅली दरम्यान जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या समवेत उपजिल्हाधिकारी निवडणूक सदाशिव पडदुणे, उपजिल्हाधिकारी सामान्य सुनिल यादव, उपविभागीय अधिकारी तहसिलदार स्वप्नील पवार, नायब तहसिलदार हरीश काळे, नायब तहसिलदार कुलदीप देशमुख,नायब तहसिलदार श्रावण उगले, नायब तहसिलदार राजेश जाधव, अध्यक्ष सायकलीस्ट क्लब लातूर व त्यांचे सदस्य आणि इतर अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

लातूर तालुक्यातील सर्व नागरीकांना / मतदारांना आवाहन करण्यात येते की,ज्यांचे नाव मदार यादीत नाहीत व ज्यांचे वय दि. 01 जानेवारी, 2022 रोजी 18 किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्यांनी दि. 01 नोव्हेंबर 2021 ते दि.30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. तसेच ज्या मतदारांचे नाव दुरुस्ती करावयाचे आहे किंवा ठिकाण / पत्ता बदलावयाचे आहे तसेच मयत व कायम स्थलांतरीत झाल्यामुळे मतदार यादीतल नावाची वगळणी करावयाचे आहे त्यांनी योग्य तो नमुना अर्ज ऑलनालाईन स्वरुपात WWW.NVSP.IN या संकेतस्थवावर किंवा VOTER HELPLINE APP  च्या माध्यमातून अर्ज सादर करावे.

तसेच अपवादात्मक परिस्थीतीत वरील सर्व अर्ज हस्तलिखित स्वरुपात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेमार्फत सुध्दा स्विकारले जातील, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सुनील यादव, तहसिलदार तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी स्वप्नील पवार यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु