जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने दहा ठिकाणी भव्य कायदेविशक जनजागृती शिबीर संपन्न

 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने

दहा ठिकाणी भव्य  कायदेविशक जनजागृती शिबीर संपन्न

 

लातूर,दि.1(जिमाका):- मा. सर्वोच्च न्यायालय व मा. महाराष्ट्र  राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि. 02 ऑक्टोबर 2021 ते दि. 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमानिमित्त लातूर जिल्हयामध्ये गावोगावी कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 

            कायद्याची जनजागृती करण्यासाठी आज मौजे चिंचोली (ब), ढोकी, येळी, काटगाव, सेलु (बु.), बोपला, मुरुड अकोला, भोयरा, महाराणा प्रताप नगर, मुशिराबाद  येथे भव्य कायदेविशयक शिबीर घेण्यात आले.

            या कार्यक्रमास चिंचोली(ब) येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक राधाकृष्ण  व्यवहारे होते. प्रमुख पाहूणे म्हणून मधुकर जोगदंड, सरपंच, विश्वास वसंत कावळे होते तर मार्गदर्शक म्हणुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे पॅनल अॅड. अशोक जोंधळे व अॅड. एन. पी. गायकवाड होते. अॅड. अशोक जोंधळे यांनी बालकांचा शिक्षणाचा अधिकार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व ज्येष्ठ नागरिकांचा कायदा या विषयी माहिती दिली. अॅड. एन. पी. गायकवाड यांनी कौटुंबिक हिंसाचार व महिलांचे अधिकार याविषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन उपस्थित गावकऱ्यांना दिली.  येथील कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती एस. पी. वाघचौरे, विधी स्वयंसेवक यांनी केले तर सुत्रसंचालन अशोक जोंधळे यांनी केले तर आभार राजकुमार सुरवसे, तंटामुक्ती अध्यक्ष, यांनी केले. कार्यक्रमास गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

            येळी-ढोकी येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून गावचे सरपंच, अनिरुध्द पाटील हे उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे पॅनल अॅड. उमाकांत राउत, अॅड. बिना कांबळे व अॅड. गायत्री नल्ले हे आवर्जुन उपस्थित होते.

          या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अॅड. उमाकांत राउत यांनी वारसाचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व कर्तव्य, बालसंरक्षण अधिनियम व बालकांचे शिक्षणाचे हक्क या विषयावर माहिती दिली. अॅड. बिना कांबळे यांनी लोकअदालतचे महत्व सांगताना, लोकअदालत मध्ये आपला वेळ व पैसा वाचतो व लवकर निकाल मिळतो असे सांगीतले. याच बरोबर वादपुर्व कथनाचे महत्व बेटी बचाओ बेटी पढाओ व समुपदेशन या विषयी महत्वाची माहिती दिली.  तसेच अॅड. गायत्री नल्ले यांनी महिलांचे कायदे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभार व्यक्त खोसे यांनी केले. या कार्यक्रमास गावातील नागरिक, सरपंच, ग्रामसेवक आदी उपस्थित होते. कायदेविषयक शिबीर यशस्वी होण्यासाठी ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांचे विशेष सहकार्य लाभले.

            काटगाव येथे  कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गावचे  उपसरपंच गुणवंत अमृत सरवदे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे ग्रामविकास अधिकारी, प्रशांत रेड्डी  होते. प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूरच्या विधी स्वयंसेवीका सौ. पार्वती सोमवंशी हे होते. यांनी महिलांचे अधिकार व कर्तव्ये, कौटुंबिक हिंसाचार इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अॅड. रोहण गंडले यांनी या कार्यक्रमाचे प्रस्तावना केले यात त्यांनी ज्येष्ठांचे अधिकार व मोफत वकील मिळण्याबाबतचे अधिकचे माहिती सविस्तर विस्ताराने सांगीतले. तर सुत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी प्रशांत रेड्डी यांनी केले. तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रविण कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमास गावचे पुरुष व महिला मोठया प्रमाणात उपस्थित होते.

            सेलु (बु) येथील कायदे विषयी शिबीरास अध्यक्षा म्हणून गावचे सरपंच भागीरथी दोरवे उपस्थित होते. प्रमुख पाहूणे व मार्गदर्शक म्हणून विधी स्वयंसेवक बळीराम कानवटे, राहुल चेबळे व आशिष कुटवाडे हे होते. बळीराम कानवटे यांनी लोकन्यायालय, राहुळ चेबळे यांनी विधी सेवा प्राधिकरण व आशिष कुटवाडे यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा इ. विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले व कायद्याचे महत्व जनतेस पटवुन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सुधीर धडकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार कदम आर. एस. यांनी केले. सदरील कार्यक्रमास गावचे सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष , शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.

            बोपला येथील कायदे विषयी शिबीरास प्रमुख पाहूणे व मार्गदर्शक म्हणून विधी स्वयंसेवक अक्षयकुमार बनसोडे व भोसले बालाजी हे होते. अक्षयकुमार बनसोडे यांनी ज्येष्ठ नागरिकांचा कायदा या विषयावर सविस्तर असे विवेचन केले. तसेच  विधी स्वयंसेवक, बालाजी भोसले यांनी ग्राहकांचे अधिकार या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन पी. पी. माळी, ग्रामसेवक यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार लक्ष्मण ठाकुर यांनी व्यक्त केले. सदरील कार्यक्रमास गावचे सरपंच, ग्रामसेवक, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

            मुरुड अकोला येथील कायदेविषयक शिबीरास अध्यक्ष म्हणुन उपसरपंच म्हणुन बिडवे शिवरुद्र हे होते. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या पॅनल अॅड. आखाते छाया उपस्थित होत्या. यावेळी यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनाबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी ओम भुजबळ यांनी केले तर सुत्रसंचालन विलास बिडवे यांनी केले. तर आभार दुधाटे सुलोचना यांनी व्यक्त केले. सदरील कार्यक्रमास गावचे सरपंच, ग्रामसेवक, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

            मुशीराबाद येथील कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन अॅड. वसंत गायकवाड हे होते. प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या पॅनल अॅड. सुनैना बायस व विधी स्वयंसेवक पृथ्वीसिंह बायस हे उपस्थित होते. विधी स्वयंसेवक, पृथ्वीसिंह बायस यांनी रॅगिंग, वैकल्पिक वाद-निवारण पध्दती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व बालकांना मोफत कायदे या विषयी माहीती दिली तर अॅड. सुनैना बायस कौटुंबिक हिंसाचार व बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. आर. सी. पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन बालाजी मंदरुनले, उपसरपंच यांनी केले. सदरील कार्यक्रमास गावातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

            भोयरा येथील कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन गावचे सरपंच म्हणुन विजय लिंबराज सुर्यवंशी हे होते. प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या पॅनल अॅड. आखाते छाया उपस्थित होत्या यावेळी यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनाबद्दल विशेष माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धावारे एस.आर. ग्रामसेवक यांनी केले तर सुत्रसंचालन नंदा मस्के यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार श्रीमती आवाड यांनी व्यक्त केले. सदरील कार्यक्रमास गावातील नागरिक, ग्रामसेवक, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

      महाराणा प्रताप नगर येथील कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सरपंच, संगीता पंतगे  होते. प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या पॅनल अॅड. सुनैना बायस व विधी स्वयंसेवक पृथ्वीसिंह बायस हे उपस्थित होते. अॅड. सुनैना बायस कौटुंबिक हिंसाचार व बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर माहिती दिली. विधी स्वयंसेवक, पृथ्वीसिंह बायस यांनी रॅगिंग, वैकल्पिक वाद-निवारण पध्दती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व बालकांना मोफत कायदे या विषयी माहीती दिली. अॅड. आर. सी. पाटील यांनी बालकांचे अधिकार या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  व सुत्रसंचालन के. बी. कलबुले, ग्रामसेवक यांनी केले. सदरील कार्यक्रमास गावातील  जिल्हा परिषद सदस्य, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, गावातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

            तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर येथील न्यायिक कर्मचारी, जिल्हा न्यायालयाचे अॅड. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे पॅनल अॅड. विधी स्वयंसेवक तसेच उपरोक्त गावातील ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी शिक्षीका यांनी विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा