एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2021-22 मनुष्यबळ विकास कार्यक्रम शेतकरी प्रक्षेत्र प्रशिक्षण दौरा संपन्न
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2021-22 मनुष्यबळ विकास कार्यक्रम शेतकरी प्रक्षेत्र प्रशिक्षण दौरा संपन्न लातूर दि.30(जिमाका):- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२१-२२ मनुष्यबळ विकास कार्यक्रम अंतर्गत लातूर उपविभागातील शेतक-यांसाठी प्रक्षेत्र प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक 22 ते 25 मार्च 2022 या कालावधीत करण्यात आले होते. शेतकऱ्याची निवड सोडत पध्दतीने तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली होती. या प्रक्षेत्र प्रशिक्षणासाठी लातूर तालूक्यातून 15, औसा तालुक्यातुन-9, निलंगा तालूक्यातुन-12, रेणापुर तालूक्यातुन-18 आणि शिरूर अनंतपाळ तालूक्यातून-4 असे एकुण 58 शेतकरी सहभागी झाले होते. असे उपविभागीय कृषि अधिकारी लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. दिनांक 22 मार्च 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, उप विभागीय कृषि अधिकारी आर.एस.कदम यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी रवाना करण्यात आले होते. या दौऱ्यामध्ये सर्वप्रथम दिनांक 22 मार्च 2022 रोजी सोलापूर येथील ...