राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा लातूर जिल्हा दौरा
राज्याचे
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
यांचा लातूर जिल्हा दौरा
*लातूर,दि.26(जिमाका):-* राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक
चव्हाण हे दिनांक 27 मार्च, 2022 रोजी
लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार, दिनांक 27 मार्च, 2022 रोजी
सकाळी 8.00
वाजता नांदेड येथून मोटारीने, लातूरकडे प्रयाण करतील. सकाळी 10.30 वाजता लातूर येथे
आगमन व रेणापूर तालुक्यातील खरोळा येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन समारंभास उपस्थिती.
सकाळी 12.15 वाजता पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन वसतीगृह परिसर, येथे अल्पसंख्यांक
मुलींच्या वसतीगृहाच्या लोकार्पण समारंभास उपस्थिती. सकाळी 12.30 वाजता बांधकाम भवन,
औसा रोड येथे अधिक्षक अभियंता (सा.बा.) विभाग, लातूर कार्यालयाच्या उद्घाटन समारंभास
व विविध विकास कामांच्या भूमिपूजन समारंभास उपस्थिती.
दुपारी 1.30 वाजता दिलीपराव देशमुख यांच्या आशियाना या
निवासस्थानी राखीव दुपारी 2.30 वाजता लातूर येथून मोटारीने तुळजापूरकडे प्रयाण.
****
Comments
Post a Comment