जिल्ह्यातील एकल कलावंत मानधन योजनेसाठी एकल कलावंताच्या प्रस्तावातील त्रुटींची पुर्तता कराव्यात ---- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या सुचना · जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध
जिल्ह्यातील एकल कलावंत मानधन योजनेसाठी
एकल कलावंताच्या प्रस्तावातील त्रुटींची पुर्तता कराव्यात
---- जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी.पी. यांच्या सुचना
·
जिल्हा परिषद
व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध
लातूर दि.15 (जिमाका)
:-
एकल कलावंताचे प्रस्तावात त्रुटीपुर्तता करुन
करण्याबाबत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सुचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या अध्यक्षतेखाली
समितीमार्फत जिल्ह्यातील एकल कलावंत मानधन योजनेसाठी दहा तालुक्यातुन संबंधित तहसिलदार
यांच्याकडून प्राप्त झालेल्या एकुण 3 हजार 40 पैकी, पात्र कलावंत 552 तर अपात्र कलावंत 2 हजार 488 असुन
दिनांक 11 मार्च 2022 रोजी बैठकीत समितीने असा निर्णय घेतला 552 पात्र एकल कलावंताची
आणि अपात्र 2 हजार 488 ची यादी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
zplatur.gov.in व latur.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेली आहे.
अपात्र यादीतील लाभार्थींनी त्रुटीची
पुर्तता संबंधित तहसिलदाराकडे आठ दिवसाच्या आत करावी. तसेच समितीमार्फत पात्र
केलेल्या यादीमध्ये कुणाचीही हरकत असल्यास आपल्या हरकती संबंधित तहसिलदार यांच्याकडे
सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा एकल कलावंत निवड समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज
बी.पी. यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment