जलसुरक्षा सप्ताह संपन्न भुपृष्ठावर असलेल्या पाण्याचे संवर्धन करावे
जलसुरक्षा सप्ताह संपन्न
भुपृष्ठावर असलेल्या पाण्याचे संवर्धन करावे
लातूर,दि.16(जिामाका):- जल सुरक्षा सप्ताह 16 मार्च 22 मार्च हा सप्ताह दरवर्षी म्हणून जलसंपदा
विभागामार्फत साजरा करण्यात येतो या मध्ये भूपृष्ठावर असलेल्या पाण्याचे संवर्धन कसे
करायचे या बाबतीत जनजागृती करण्यात येते. या वर्षीही जिल्ह्यात पाणी संवर्धन बाबत महत्व
पटवून देण्याची मोहिम आज पासून सुरु करण्यात आली. यावेळी जल संवर्धनाची शपथ देण्यात
आली.
मोहिमे मध्ये पोस्टर ऑडियो क्लिप, व्हिडियो क्लिप, यांचा सुध्दा
वापर करून जनजागृती केली जाती. तसेच पाणी जीवनासाठी
किती आवश्यक आहे व गरजेचे आहे, याचे महत्त्व पटवून दिले जाते. जरी विज्ञानाने किती
प्रगती केली, तरी आज आपण पाणी व रक्त या दोन गोष्टी कृत्रिमरित्या निर्माण करू शकत
नाही. त्यामुळे जल संवर्धन गरजेचे आहे.
त्यासाठी भुपृष्ठावर असणारे पाणी ते पिण्यासाठी,
शेतीसाठी (ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकमर इरिगेशन,वापरण्यात यावे उद्योगासाठी वापरलेले
पाणी ज्यावेळेस वेस्ट वॉटर म्हणून शिल्लक राहते त्यावेळी त्यावर म्हणजे रिसायकलिंग
करून परत वापरण्यात यावे. जेणे करून पाण्याचा काटकसरीने वापर होईल. कारण भारतातील पाऊस
हा लहरी पाऊस आहे त्यामुळे पाऊस कधी 130 टक्के ते 140 टक्के पर्यंत पडतो तर कधी सरासरी प्रर्जन्य
50 ते 60 टक्के पडतो . त्यामुळे कधी अतिवृष्टी कधी कोरडा दुष्काळ या समस्येला भारतीयांना सामोरे जावे लागणार असल्याचा
मुद्दाही जलसंपदेच्या प्रतिज्ञेत करण्यात आला आहे. त्यामुळे पडलेल्या पाण्याचा थेंब
योग्य रीतीने साठवून संवर्धन केल्यास आपणास त्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही.
त्यासाठी हा जलजागृती सप्ताह केवळ सप्ताह म्हणून साजरा न करता वर्ष भर पाण्याचे नियोजन
पिण्यासाठी शेतीसाठी उद्योगासाठी केलेतर यावर मात करता येईल अशा प्रकारची प्रतिज्ञा
घेवून जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून देऊ असे जलसंपदा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
0000
Comments
Post a Comment