येत्या 18 व 22 मार्च रोजी धुलीवंदन व रंगपंचमी सणा निमित्त मद्य विक्री बंद

 

येत्या 18 व 22 मार्च रोजी धुलीवंदन व रंगपंचमी

सणा निमित्त मद्य विक्री बंद

 

लातूर,दि.17,(जिमाका):- लातूर जिल्ह्यात धुलीवंदन तसेच रंगपंचमी सण शांततेत पार पाडण्यासाठी लातूर जिल्ह्याच्या शहरातील अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवणे आवश्यक आहे. त्या करिता जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.लातूर यांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 135 (सी) तसेच मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 नुसार तसेच नमुद कायद्यांतर्गत केलेल्या विविध नियमानुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन खालील नमूद केले नुसार लातूर तालुक्यातील पूढील नमूद शहरांमध्ये अबकारी अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहे.

अनुज्ञप्ती बंद ठेवावयाची तारीख व वेळ व अनुज्ञप्ती बंद ठेवणाऱ्या शहरांची नांवे पूढील प्रमाणे आहेत. दिनांक 18 मार्च 2022 धुलीवंदन, सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत. उदगीर, जळकोट, देवणी, अहमदपुर व निलंगा तसेच निलंगा तालुक्यात औराद शहाजानी, तगरखेडा व शेळगी. दिनांक 22 मार्च 2022 रंगपंचमी सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत. लातूर,औसा, रेणापूर,शिरुर अनंपाळ, चाकूर व निलंगा व (निलंगा तालुक्यात औराद शहाजनी, तगरखेडा, शेळगी ही गावे वगळून)

सदर आदेशाची लातूर जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधारक सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुचराई करतील त्यांच्याविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 54 (1) (सी) नुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे ही पत्रकात नमुद केले आहे.

                                                0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु