पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडून लातूरच्या सांस्कृतिक क्षेत्राला आणखी एक भेट

 

पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडून लातूरच्या

सांस्कृतिक क्षेत्राला आणखी एक भेट

 

 सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने लातूर येथे २६ ते २८ मार्च दरम्यान लावणी महोत्सवाचे आयोजन

 

लातूर, दि.24 (जिमाका):-लातूरच्या सांस्कृतिक क्षेत्राला उभारी देण्यासाठी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या पूढाकारातून आणखी एक भेट मिळाली असून दि. २६ ते २८ मार्च दरम्यान लातूर येथे सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

  या संदर्भातील अधिक माहिती अशी की, काही दिवसा पूर्वी सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने राज्यभरात नाटय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या नाटय स्पर्धेचे केंद्र लातूरला सुरू केल्यामूळे असंख्य नाटय कलावंतानी आपली कला येथे सादर केली. शिवाय येथील रसीकांनी नाटकांचा आनंद घेतला. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अभिनव कल्पनेतून आता आजादी का अमृत महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासनातर्फे राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून लातूर येथे लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 लावणी ही महाराष्ट्रांची पारंपरिक लोककला असून आजही जनसामान्या आपली वाटते. शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत लावणी फार मोठ्या प्रमाणात प्रसिध्द आहे.  ग्रामीण भागातील रसिक प्रेक्षकांचे आजही या कलेच्या माध्यमातून मनोरंजन होत असते. आधुनिक युगात लोप पावत चाललेल्या लोककलांचे जतन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने तसेच समृद्ध लोककलेला व लोककलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी लावणी  महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी लावणी महोत्सव दि. 26 मार्च ते 28 मार्च 2022 या कालावधीत लातूर येथील स्व.दगडोजीराव देशमुख सांस्कृतिक सभागृह, कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

  या  लावणी महोत्सवाचा उद्घाटन समारंभ शनिवार दि. २६ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. लावणी महोत्सवात दि. २६ मार्च २०२२ सविता जळगावकर आणि पार्टी पुणे, न्यू अंबिका कलाकेंद्र आणि पार्टी चौफुला, पुणे, पद्मावती कलाकेंद्र आणि पार्टी मोडनींब, सोलापूर ही संघ आपली कला सादर करणार आहेत. तर दि. २७ मार्च २०२२  रोजी शीतल नागपूरकर आणि पार्टी चौफुला, पुणे,  आशा रूपा परभणीकर आणि पार्टी मोडनीब सोलापूर, उषा रेश्मा नर्लेकर आणि पार्टी पुणे यांच्या बहारदार लावण्याचा कार्यक्रम होणार आहे. दि. २८ मार्च २०२२  रोजी नूतन कलाकेंद्र आणि पार्टी इस्लामपुर, नीता काजल वडगावकार आणि पार्टी सणसवाडी पुणे, आशा वैशाली नगरकर आणि पार्टी मोडनीब यां संघाचा लावणी कार्यक्रम असणार आहे. हा तीन दिवस असणारा लावणी महोत्सव रसिक प्रेक्षकांना विनामूल्य असून जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याच्या सांस्कृतिककार्य  विभागाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत