महाडिबीटी पोर्टल वर नवीन शिष्‍यवृत्‍ती अर्ज भरावेत

 

महाडिबीटी पोर्टल वर नवीन शिष्‍यवृत्‍ती अर्ज  भरावेत

 

लातूर दि.2(जिमाका) जिल्‍हयातील सर्व शासन मान्‍यता प्राप्‍त अनुदानित/ विनाअनुदानित /कायम विनाअनुदानित महाविदयालयाचे प्राचार्य व या महाविद्यालयामध्‍ये प्रवेश घेतलेल्‍या अनुसूचित जाती , विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थी  यांनी सन 2021-22 या वर्षासाठी भारत सरकार शिष्‍यवृत्‍ती (GOI) व शिक्षण शुल्‍क, परीक्षा शुल्‍क (FREESHIP), राजर्षी शाहू महाराज गुणवत्‍ता शिष्‍यवृत्‍ती, व्‍यावसायिक पाठयक्रमांशी संलग्‍न असलेल्‍या विद्यार्थ्‍यांना निर्वाह भत्‍ता मंजूर योजनेचे अर्ज भरण्‍यासाठी महाडिबीटी हे पोर्टल  दि. 14 डिसेंबर 2021 पासून सुरु करण्‍यात आलेले आहेत, असे सहायक आयुक्त, समाज कल्याण लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थी यांनी शिष्‍यवृत्‍ती चे अर्ज अचूक भरुन मंजूरीसाठी या कार्यालयास पूढील  प्रमाणे अंतिम मुदत देण्यात आली आहे. शैक्षणिक  वर्ष  सन 2021-22  च्या नविन  नुतनीकरण अर्ज  (Fresh And Renewal)ऑनलाईन सादर करण्याची दिनांक 07 मार्च 2022 पर्यंत अंतिम मुदत, केवळ अनुसूचित जमाती प्रवर्ग,  शैक्षणिक सन 2021-22 च्या नविन व नुतनीकरण अर्ज (Fresh And Renewal)ऑनलाईन सादर करण्याची दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत अंतिम मुदत केवळ विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्ग, शैक्षणिक वर्ष सन 2020-21  च्या अर्ज रिअप्लाय (Re-apply) ऑनलाईन सादर करण्याची दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत अंतिम मुदत आहे.

 

                                                           0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु