वर्किंग वुमन हॉस्टेल आणि महिला व बालविकास भवनच्या जागेचा शोध घेऊन प्रस्ताव सादर करावा, पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले निर्देश

 

वर्किंग वुमन हॉस्टेल आणि महिला व बालविकास भवनच्या जागेचा शोध घेऊन प्रस्ताव सादर करावा, पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले निर्देश

 

          लातूर दि.28 ( जिमाका )

लातूर जिल्ह्यात महिल आणि  बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आज आढावा घेतला. योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी असलेल्या नियोजनाची काटेकोर अमंलबजावनी करावी असे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी आजच्या आढावा  बैठकी दरम्यान दिले आहेत.

            यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

  अंगणवाडीचे बांधकाम नियमा प्रमाणे व दर्जेदार पध्दतीने होईल यादृष्टीने होईल याची दक्षता घ्यावी 

तसेच मागणी प्रमाणे प्रशासनाने अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून दयावी त्यासाठी आवश्यक तो निधी मंजूर केला जाईल. 

            लातूर येथे महिला व बालविकास भवन उभारण्यासाठी प्रशासनाने जागेचा शोध घेऊन त्या संबधी तातडीने कार्यवाही करावी आणि लातूर जिल्हयात एकूण किती वर्किंग वुमेन हॉस्टेल आहेत यांची अधिकृत नोंद सादर करावी, त्यांच्यासाठी उभारावयाच्या वसतीगृहाचा प्रस्ताव नव्याने सादर करावा, असे निर्देश बैठकी दरम्यान दिले आहेत.

नगर रचना विभागाने नियमांची काटेकोर अमंलबजावणी करावी

                लातूर नगररचना विभागामार्फत चालणाऱ्या कामाचा आढावाही आज पालकमंत्री यांनी घेतला. शहराप्रमाणे ग्रामिण भागातील रस्ते व इमारत बांधकामाच्या बाबत जे नियम आहेत त्यांची काटेकोर अमंलबाजावणी करण्याचे निर्देश या बैठकीत दिले.

        लातूर शहरासह  जिल्हयातील सर्वच शहरांच्या हद्दवाढीचे नव्याने प्रस्ताव तयार करावेत तसेच राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग,मुख्य रस्त्यापासून ठरावीक अंतरापर्यंन्त बांधकामे होऊ नयेत याची काळजी घ्यावी. खाजगी तसेच सार्वजनिक वापराच्या बांधकामाच्या ठिकाणी नियमा प्रमाणे पार्कीग व्यवस्था उभारण्याची सक्ती करावी. जेणे करून त्यांची वाहने रस्त्यात न लागता त्यांच्या पार्किंग मध्ये लागतील.

            कोणत्याही बाधकामाच्या बाबतीत  असलेल्या नियमांची काटेकार अमंलबजावनी होईल यादृष्टीने कार्यवाही करावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.

एकल कलाकार अर्थ सहाय्य प्रस्तावातील त्रुटी दूर कराव्यात

              कोरोना पार्शवभूमीवर कलाकारांना अर्थसहाय्य देण्या बाबत महाराष्ट्र शासन पर्यटन व संस्कृतीक कार्यविभागांच्या शासन निर्णयान्वये राज्यातील एकल कलाकार यांना 5000/- (पाच हजार रुपये) मानधन देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील एकल कलाकाराचे मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले असून त्यात अनेक त्रुटी आहेत. त्या त्रुटी प्रशासकीय यंत्रणे मार्फत दुरुस्त करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची सूचनाही पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी दिली.

मांजरा आणि तेरणा कालव्याचे पाणी  सोडले

             मांजरा आणि तेरणाचे पाणी सोडण्यात आले असून मोठ्या अनधिकृत मोटार, पाईप काढल्यामुळे विनाअडथळा पाणी कालव्यात गेले. कालवा समितीच्या बैठकित ठरल्याप्रमाणे समिती सदस्यांना कारवाई केल्या बाबत आणि त्यांनी सुचविलेल्या सूचनाची अंमलबजावणी केल्याचे लेखी कळविण्यात यावे असे निर्देश जलसंधारण विभागाला पालकमंत्री यांनी यावेळी दिले.

 


                                                                          0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु