अंतर राष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिना निमित्त तृतीयपंथी मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह -सहाय्यक आयुक्त समाज कल्याण
अंतर राष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिना निमित्त
तृतीयपंथी मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह
-सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण
लातूर
दि. 28 ( जिमाका) राज्यातील तृतीयपंथी यांच्या समस्या तसेच तक्रारी संदर्भात
तक्रार निवारण समितीची स्थापना दिनांक 7 ऑक्टोबर 2020 च्या शासन निर्णयान्वये करण्यात
आलेली आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यामध्ये तृतीयपंथी यांचे तक्रार निवारण व त्यांच्या
हक्कांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.
दिनांक 31 मार्च 2022 हा दिवस आंतरराष्ट्रीय
तृतीयपंथी ओळख दिन म्हणुन जगभर साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्तांने दिनांक
27 मार्च, 2022 ते दिनाक 2 एप्रिल, 2022 हा तृतीयपंथीय मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह
म्हणुन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या सप्ताहामध्ये एका दिवसाचे तृतीयपंथी मतदार नाव नोंदणीसाठी विशेष शिबीराचे आयोजन
करण्यात आले आहे.
0000
Comments
Post a Comment