लातूर जिल्ह्यातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम दर्जेदार व जलदगतीने पूर्ण करावे - पालकमंत्री अमित देशमुख
लातूर जिल्ह्यातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे
काम
दर्जेदार व जलदगतीने पूर्ण करावे
-
पालकमंत्री अमित देशमुख
▪ पालकमंत्र्यांकडून लातूर ते ममदापूर दरम्यान कामाची पहाणी
▪ लातूर शहरातून जाणाऱ्या महामार्गावर भविष्यातील शहराचा विस्तार आणि
नागरिकांची मागणी लक्षात घेता उड्डाण पूलाचा प्रस्ताव
कायम ठेवावा
▪ महामार्गावरील व्हेईकल अंडरपास योग्य ठिकाणी व तांत्रिकदृष्टया योग्य
पध्दतीने बांधावेत
▪ महामार्गावरील सर्व्हिस रोडचे
योग्य पध्दतीने नियोजन करावे
लातूर दि.19 ( जिमाका ) लातूर जिल्हयातून जाणाऱ्या तुळजापूर – नागपूर (एनएच ३६१) हा महामार्गाचे काम दर्जेदार पध्दतीने व जलद गतीने पूर्ण करावे असे, निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.
पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूर जिल्हयातून जाणाऱ्या तुळजापूर – नागपूर (एनएच ३६१) या महामार्गाच्या कामाची लातूर – भातागळी – महमदापूर दरम्यान आज पहाणी केली. मांजरा नदीवरील पूल आणि महमदापूर गावानजीकचा उड्डाणपूल या संदर्भाने गावकऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेऊन काही सुचना केल्या आणि हे काम दर्जेदार व जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, लातूर शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम सुरू झाले असले, तरी भविष्यातील शहराचा विस्तार आणि नागरिकांची मागणी लक्षात घेता संपूर्ण शहरादरम्यान उड्डाण पूलाचा प्रस्ताव कायम ठेवावा. या संदर्भात केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नव्याने विनंती व पाठपूरावा करण्यात येईल, असे सांगून शहराजनीक काही भागात रस्त्याची रूंदी ६० मीटर शक्य असतांना तेथे ३० मीटरचा रस्ता होत असल्याचे निर्दशनास येत आहे, यात तातडीने दुरूस्ती करावी. महामार्गावरील शहरातील व गावाजनीकचे व्हेइकल अंडरपास योग्य ठिकाणी व तांत्रिकदृष्टया योग्य पध्दतीने बांधावेत. महामार्गावरील सर्व्हिस रोडचे योग्य पध्दतीने नियोजन करावे, आदी सुचना यावेळी पालकमंत्री देशमुख यांनी संबंधितांना दिल्या.
यावेळी नॅशनल हायवेचे प्रकल्प व्यवस्थापक सुनील पाटील,
उपप्रकल्प व्यवस्थापक सुरज चव्हाण, गंगामाई कन्स्ट्रक्शनचे सुनील देशमुख, महापौर विक्रात
गोजमगुंडे, दिपक सुळ, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेल, उपसभापती मनोज पाटील,
रेणा कारखान्याचे संचालक संभाजी रेड्डी, सुभाष घोडके, सचिन दाताळ, परमेश्वर पाटील,
बाबासाहेब गायकवाड, सतीश शिंदे, सतीश पाटील, दगडूसाहेब पडिले, रामचंद्र पाटील, नंदकुमार
देशमुख, रमाकांत वंगवाड, ज्ञानोबा गवळी, मंडळ अधिकारी सुरेश गवळी, तलाठी रेणुका पुरी
आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी विविध पदाधिकारी भातांगळी, ममदापूर येथील ग्रामस्थांची
उपस्थिती होती.
****
Comments
Post a Comment