सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनांच्या फिरत्या वाहनाद्वारे प्रसिद्धी उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांच्या हस्ते झेंडा दाखवून वाहन मार्गस्थ
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनांच्या
फिरत्या वाहनाद्वारे प्रसिद्धी उपक्रमाचे उद्घाटन
जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांच्या हस्ते झेंडा दाखवून
वाहन मार्गस्थ
लातूर दि.8 ( जिमाका ):- विशेष घटक योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती देणासाठी फिरत्या वाहनाद्वारे दृकश्राव्यच्या माध्यमातून गावागावात योजना पोहचविण्याच्या उपक्रमाचे आज जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, तसेच जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते झेंडा दाखवून या वाहनाला मार्गस्थ करण्यात आले. हे वाहन जिल्ह्यातील विविध गावातून फिरणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून वाहने उद्घाटनानंतर जिल्हा दौऱ्यासाठी मार्गस्थ करण्यात आली. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी म. रो. दुशिंग, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या कार्यालय अधीक्षक श्रीमती आशाताई लाखाडे आदींची उपस्थिती होती.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची
माहिती या फिरत्या वाहनाद्वारे जिल्ह्यात पोहचविण्याचा प्रयत्न आहेत. वाहनांवरील दृकश्राव्य
माध्यमातून योजनांची माहिती असणाऱ्या जिंगल्स ऐकविण्यात येणार आहेत. गावा-गावात पोहचून विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचीत जातींसाठीच्या विद्यार्थी,
तरूण तसेच महिला, शेतकरी आदी घटकांसाठीच्या शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, विविध प्रकारची
प्रशिक्षणे, महिला सक्षमीकरण, लाभार्थी व समूह योजनांची माहिती पोहचविण्याचा उद्देश
आहे. तालुक्यांची विभागणी करून देण्यात आली असून, त्यासाठीचा मार्गही निश्चित करण्यात
आला आहे. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी फिरत्या वाहनाद्वारे प्रचार-प्रसिद्धीबाबतची
संकल्पना विशद केली.
****
Comments
Post a Comment