पालकमंत्री अमित देशमुख यांचा लातूर जिल्हा दौरा
*पालकमंत्री अमित देशमुख यांचा लातूर जिल्हा दौरा*
*लातूर,दि.27(जिमाका):-* राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांचा दिनांक 28 मार्च, 2022 रोजी लातूर
जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार,
दिनांक 28 मार्च, 2022 रोजी
सकाळी 9.45 वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालय,
डी.पी.डी.सी. सभागृह लातूर येथे शासकीय बैठकीसाठी राखीव. सकाळी 9.45 ते 10.30 वाजता
लातूर जिल्हा सर्व शासकीय विभागाची विकास कामांचा आढावा बैठकीस उपस्थिती. (उपस्थिती
:- जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त मनपा, अधिष्ठाता विलासराव देशमुख
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व
संबंधित सर्व अधिकारी).
सकाळी 10.30 ते 11.00 वाजता लातूर जिल्हा रोजगार हमी योजना
आढावा बैठक, सकाळी 11.00 ते 11.30 लातूर जिल्हा पुरवठा विभाग वितरण आढावा बैठक, सकाळी
11.30 ते 12.00 वाजता गौण खनिज आढावा बैठक व प्रादेशिक परिवहन अधिकारी व संबंधित अधिकारी,
दुपारी 12.00 ते 12.30 वाजता रमाई आवास योजना सन 2021-22 या वर्षीचे उद्दीष्ट पुर्ती
मंजुरी बैठक,दुपारी 12.30 ते 1.00 वाजता वध्द कलावंत व एकल कलावंत समिती आढावा बैठक,
दुपारी 1.00 वाजता शहीद सैनिक कै. लांडगे गणपती सुरेश रा. लोदगा यांच्या कुटुंबियास
शासनामार्फत 1 कोटी आर्थिक मदत धनादेश वितरण कार्यक्रम.
खोरे गल्ली लातूर येथे सायंकाळी 6.30 वाजता लातूर
शहर महानगरपालिका अंतर्गत प्रभाग 9 मधील मोहल्ला क्लिनिक लोकार्पण, कार्यक्रमास उपस्थिती.
****
Comments
Post a Comment