व्यवसायकर नोंदणी दाखला पीटीआरसी धारकांनी येत्या 31 मार्चपर्यंत ई- रिटर्न (ई-विवरण पत्रे) देय कर व व्याज भरुन विलंब शुल्काशिवाय भरावेत -- जिल्हा व्यवसाय अधिकारी शिवलिंग स्वामी

 

व्यवसायकर नोंदणी दाखला पीटीआरसी धारकांनी येत्या 31 मार्चपर्यंत

ई- रिटर्न (ई-विवरण पत्रे) देय कर व व्याज भरुन विलंब शुल्काशिवाय भरावेत

-- जिल्हा व्यवसाय अधिकारी शिवलिंग स्वामी

            लातूर दि.15 (जिमाका) :- सर्व व्यवसायकर नोंदणी दाखला पीटीआरसी ( PTRC) धारकांनी                            31 डिसेंबर 2021 पर्यंत व्यवसायकर ई-रिर्टन दाखल केले नसतील, त्यांना व्यवसायकर कायदा - 1975 अंतर्गत शासनाच्या अधिसूचनेनूसार 31 डिसेंबर, 2021 पर्यंतच्या कालावधीचे ई- विवरणपत्र दाखल करावयाचे राहिले असल्यास ते आता विलंब शुल्काशिवाय दि. 31 मार्च, 2022 पर्यंत भरता येणार आहेत.

            दिनांक 31 डिसेंबर 2021 चे सर्व ई- रिटर्न (ई-विवरण पत्रे) देय कर व व्याज भरुन विलंब शुल्का शिवाय दि. 31 मार्च, 2022 पर्यंत दाखल करता येतील. याची सर्व पीटीआरसी  (PTRC)  धारकांनी नोंद घ्यावी व त्यासाठी  https://www.mahagst.gov.in/  संकेतस्थळाला भेट द्यावी असे जिल्हा व्यवसाय अधिकारी शिवलिंग स्वामी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु