जिल्ह्यातील 60 शेतकऱ्यांसाठी 22 ते 26 मार्च दरम्यान प्रशिक्षण सहलीचे आयोजन अर्ज करण्याचे कृषि विभागाकडून आवाहन

 

जिल्ह्यातील 60 शेतकऱ्यांसाठी 22 ते 26 मार्च

दरम्यान प्रशिक्षण सहलीचे आयोजन

अर्ज करण्याचे कृषि विभागाकडून आवाहन

 

      लातूर,दि.3(जिमाका):- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2021-22 मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत लातूर कृषि उपविभागातील लातूर-14, औसा-18, निलंगा-13, रेणापूर-10, आणि शिरुर अनंतपाळ-5 असे एकुण 60 शेतकऱ्यांसाठी प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रम राबवावयाचा आहे. सदर प्रशिक्षण सहल दि. 22 ते 26 मार्च 2022 या कालावधी  मध्ये  असून प्रशिक्षण सहलीमध्ये सोलापुर, बारामती, राजगुरुनगर, आळंदी, मोशी पुणे, तळेगाव दाभाडे, बाभळेश्वर, शिर्डी, राहूरी कृषि विद्यापीठ या ठिकाणी असलेल्या संशोधन केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतीस भेट, किसान प्रदर्शन इ. स्थळांना भेटीचे नियोजन असल्याचे उपभिागीय कृषि अधिकारी, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

          तरी फलोत्पादन विषयक घटक राबविलेले तसेच राबविण्यास इच्छूक असलेल्या 25 ते 50 वर्षे वयोगटातील किमान 10 वी उत्तीर्ण असलेल्या प्रगतशिल शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात दि. 10 मार्च 2022 पर्यंत लेखी अर्ज सादर करुन पोंच घ्यावी.अर्जासोबत सातबारा, दहावीची सनद, आधार कार्ड, कोविडच्या दोन्ही लस घेतल्याचे प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक राहिल. अनु.जाती / अनु. जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्राधान्य राहील. त्याबाबत जातीचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे अवश्यक राहील. तालुका निहाय लक्षांकां प्रमाणे कमी अर्ज आल्यास तालुक्या अंतर्गत लक्षांक कमी / जास्त करण्यात येईल.

         लक्षांकाप्रमाणे जास्त  अर्ज आलेल्या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांची निवड सोडत (लॉटरी) पध्दतीने करण्यात येईल्. निवड झालेल्या शेतकऱ्यांनी लोकसहभाग म्हणून प्रत्येकी रु. 800 रु. रक्कमेचा धनाकर्षक (डी.डी.) निवड यादी लागल्यापासून दोन दिवासत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जमा करावा. प्रशिक्षण कालावधी मध्ये भोजन, नाष्टा व निवासाची सोय करण्यात येईल. सदर प्रशिक्षण सहलीच्या आयोजनाबाबत कोणताही बदल करण्याचे अधिकार उपभिागीय कृषि अधिकारी, लातूर यांचेकडे अबाधित राहतील.

          या प्रशिक्षण सहलीसाठी उपविभागस्तरावर समन्वयक अधिकारी म्हणुन तंत्र अधिकारी एम.एस. क्षिरसागर मो.क्र. 8668277240 यांची नियूक्ती करण्यात आलेली असून सहलीबाबत इतर माहितीसाठी त्यांचेशी संकर्प साधावा असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी आर. एस.कदम यांनी केले आहे.

 

                                                    0000

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु