लातूर शहराच्या सुरळीत वाहतुकीसाठी "बाय पास" एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून मिळणाऱ्या रक्कमेतून करणार -सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
लातूर शहराच्या सुरळीत
वाहतुकीसाठी "बाय पास"
एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून
मिळणाऱ्या रक्कमेतून करणार
-सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
§ लातूर - रेल्वे जोडणीसाठी
राज्य शासन प्रयत्न करेल
§ जिल्ह्याला जोडणाऱ्या तालुक्याच्या
रस्त्याचे जाळे मजबूत करणार
§ लातूर जिल्ह्यातील रस्त्यासाठी
42 कोटी रुपये निधी
लातूर दि. 27 ( जिमाका ) लातूर पास करून जाणारी अनावश्यक माल वाहतूक शहरात येऊन शहराच्या वाहतुकीला मोठा अडथळा ठरते त्यासाठी आपण लातूर शहरासाठी " बाय पास " सिमेंट रस्ता मंजूर करणार असून यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून मिळणाऱ्या रक्कमेतून करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली.
लातूर येथे नवनिर्मित सार्वजनिक बांधकाम अधिक्षक
अभियंता कार्यालयाचे उदघाटन आणि जिल्ह्यातील विविध विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी
ते बोलत होते.
यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे, आ.विक्रम काळे, आ. अमर राजूरकर,मा.आ.हनुमंत बेटमुगरिकर, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता ब. शी. पांढरे, लातूरचे अधिक्षक अभियंता सलीम शेख, कार्यकारी अभियंता एम एम पाटील, दे. भू. निळकंठ उपस्थित होते.
आज पर्यंत लातूर जिल्ह्यातील लहानमोठ्या कामाच्या मंजुरीसाठी, नकाशासाठी सार्वजनिक बांधकाम अधिक्षक अभियंता कार्यालय, उस्मानाबाद येथे जावे लागत होते. आता नवीन अधिक्षक अभियंता कार्यालय मागच्या डिसेंबर पासून लातूर मध्ये सुरु केले आहे. त्यामुळे आता जिल्ह्याच्या विकासाला अधिक चालना मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागात लोकांच्या बढती अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या, त्यामुळे कनिष्ठ अभियंता आता उप अभियंता झाले. त्यामुळे रिक्त जागेच प्रमाण वाढले असून या जागा एम.पी.एस. सी कडून भरल्या जाणार असल्याचे सांगून येत्या काळात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितल्या प्रमाणे आता जिल्ह्याला जोडणारे तालुक्यातील रस्त्याचे जाळे मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत त्यातून जलद दळणवळण होईल आणि विका
साला गती प्राप्त होईल असे प्रतिपादनही चव्हाण यांनी केले.
लातूर नांदेड रेल्वे जोडणी
लातूर
– नांदेड रेल्वे जोडणी हा अत्यंत महत्वपूर्ण प्रकल्प असून लातूर रोड, अहमदपूर, लोहा,
नांदेड हा अवघा शंभर किलोमीटर अंतर जोडायचे
आहे. सद्या लातूर वरून नांदेडला रेल्वेनी येणाऱ्या प्रवाशाला खूप उलटा सुलटा प्रवास
करावा लागतो. यासाठी खूप वेळ लागतो. हा सरळ मार्ग झाला तर हा प्रवास फक्त तास दीड तासावर
येईल. या रेल्वे मार्गाच्या जोडणीसाठी साडे तीन हजार कोटी पेक्षा अधिकचा निधी लागणार
आहे. यातला अर्धा निधी राज्य शासन उचलेलं. इथून पुढे यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करु
या असे आवाहनही सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी केले.
शासकीय इमारती, रस्ते असे खूप मोठे विकासाचे कोट्यावधी रुपयाचे विकासकामं आज लातूर जिल्ह्यात सुरु आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लातूर जिल्ह्याला भरभरून दिल्याची भावना लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी बोलून दाखविली. तसेच विकासात महत्वाची भूमिका असलेले अधिक्षक अभियंता कार्यालय लातूरला दिले. समृद्धी महामार्ग जसा होतो आहे तसाच समृद्धी महामार्ग 2 नागपूर – नांदेड – लातूर – सोलापूर – पुणे – मुंबई व्हावा अशी मागणीही अमित देशमुख यांनी यावेळी केली.
रस्त्याचे जाळे करतांना ते अत्यंत दर्जेदार व्हावे. इतर विभाग रस्ते व्हावेत तर मराठवाड्यासारखे असे उदाहरण द्यावेत अशा कामाची अपेक्षा असल्याचे सांगून लातूरला बाह्य वळण रस्ता मिळणार असल्याचे सांगितले. आपण लातूर जिल्ह्यातील रस्ते डिजिटल प्लॅटफॉर्मवर घेणार असून त्यामुळे खराब झालेला रस्ता लागलीच कळेल. लवकर दुरुस्ती केली तर रस्ते उत्तम राहू शकतात म्हणून आपण हा डिजिटल प्लॅटफॉर्म प्रकल्प हाती घेणार असल्याचेही पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
लातूर येथे नव्याने मंजूर झालेल्या सार्वजनीक
बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता कार्यालयाचे तसेच ३७ रस्त्यांचे व पूलाचे भूमिपूजन
माजी मुख्यमंत्री तथा विदयमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते
आज करण्यात आले.
1️⃣एशियन विकास बॅकेच्या निधीमधून लातूर शहराला आणखी एक बाहयवळण रस्ता
काँक्रीटमध्ये बांधून देण्याचे आश्वासन आदरणीय अशोकराव चव्हाण यांनी दिल्या बददल या
कार्यक्रमात पालकमंत्री अमित देशमुख यांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले
2️⃣नागपूर-नांदेड-लातूर
-सोलापूर-पूणे-मुबंई
दरम्यान समृध्दी महामार्ग 2 उभारून मराठवाडयाच्या विकासाला गती दयावी अशीही मागणी केली
3️⃣ लातूर जिल्हयातील तालुक्याच्या ठिकाणावरून
जिल्हा मुख्यालयाला जोडणाऱ्या रस्त्याचे महामार्गाच्या धर्तीवर बांधकाम करण्याचा अराखडा
मंजूर करावा
4️⃣लातूर येथे अदययावत नवीन विश्रामगृह
बांधकामासाठी मंजूरी देण्यात यावी
5️⃣नव्याने मंजूर झालेले लातूर येथील अधिक्षक
अभियंता कार्यालय तसेच कार्यकारी अभियंता कार्यालयातील रिक्त पदे भरावीत
6️⃣लातूर जिल्हयातील कंत्राटदाराचे थकीत
बिले अदा करण्यासाठी निधी मंजूर करावा आदी मागण्याही पालकमंत्री यांनी याप्रसंगी बोलतांना
केल्या आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे आभार मानले.
****
Comments
Post a Comment