नगर पंचायतमधील नवनिर्वाचित सदस्यांची कार्यशाळा शहर विकासाचे नियोजन करतांना पायाभूत विकासाला गती द्या - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.
नगर पंचायतमधील नवनिर्वाचित सदस्यांची कार्यशाळा
शहर विकासाचे नियोजन करतांना पायाभूत
विकासाला गती द्या
- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.
§ 5 स्टार (Five Star) स्मार्ट सिटीझन
प्रोत्साहन मानांकन संकल्प राबविण्यात येणार
लातूर दि.7(जिमाका):- सार्वत्रिक नगर
पंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व नगरपंचायत सदस्यांना व तसेच स्विकृत
सदस्य यांना नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील विविध योजनाची माहिती व्हावी, व
त्यातून शहराच्या पायाभूत विकासाला गती प्राप्त व्हावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी. पी. यांनी केले.
जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात चाकूर, देवणी, जळकोट व शिरुर
अनंतपाळ नगर पंचायतीच्या नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांसाठी तसेच स्विकृत सदस्य
यांना नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील विविध योजनाची माहिती मिळावी म्हणून
कार्यशाळा आयोजित केली होती. त्यात ते बोलत होते.
या कार्यशाळेस शिरुर
अनंतपाळ नगर पंचायतीचे नगराध्यक्ष धुमाळे मायावती गणेश,
उपाध्यक्ष मठपती सुषमा बस्वराज, चाकूर नगर पंचायतीचे नगराध्यक्ष माकणे कपिल
गोविंदराव, उपाध्यक्ष बिरादार अरविंद दिगंबर, देवणी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष
घोरपडे किर्ती संजय, उपाध्यक्ष मानकरी अमित शेषेराव, जळकोट नगर पंचायतीचे
नगराध्यक्ष कांबळे प्रभावती चंद्रकांत, उपाध्यक्ष किडे मन्मथ मारोतीराव, जिल्हा सह
आयुक्त सतीश शिवणे चाकूर, देवणी, जळकोट व शिरुर अनंतपाळ नगर पंचायतीचे
मुख्याधिकारी, नगर पंचायतीचे सदस्य आदिंची यावेळी उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी. पी. कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना म्हणाले की, शासनाच्या योजनेचे
निकष, अंमलबजावणी याचे मूलभूत नियोजन कळावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात
आले आहे. शहरी भागात उद्योग विकास होणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या शहराचे व्हिजन
निश्चित करावे. पदाधिकारी व सदस्य यांनी प्रशासन, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी
यांच्या समवेत सौहार्दाचे वर्तन ठेवणेही आवश्यक आहे. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक
नागरिकांच्या दोन्ही बाजू एैकून घेणे तसेच सयंम ठेवणे हेही तितकेच महत्वाचे आहे.
नगराच्या मूलभूत
सोयीसुविधा कुठे कमी आहेत हे पाहून शहराच्या विकासाठी सुयोग्य नियोजन करणे तसेच
अटी, शर्ती तसेच शासनाचे नियम, पध्दत व मार्गदर्शक सुचानांचा अवलंब करुन तसे
प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.
पी. यांनी यावेळी दिल्या.
तसेच आजच्या
कार्यशाळेमधून माहिती समजून घ्या. त्यावर काही आपले प्रश्न यावरही चर्चा करण्यात
आली. तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांना यशदा, पुणे येथेही प्रशिक्षण
देण्याबाबतही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.
यांनी सांगितले.
5 स्टार (Five Star)
स्मार्ट सिटीझन प्रोत्साहन मानांकन संकल्प
मालमत्ता कर व
पाणीपट्टीचा (ऑनलाईन पध्दतीने) किंवा वेळेत भरणा करणे. ओला व सुका कचरा वेगवेगळा
जमा करणे व प्लास्टिक न वापरणे, विजेचे बचत करणारी उपकरणे जसे लिड बल्बस, ट्युब
इत्यादीचा वापर करणे, छतावरील पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणे, पर्यावरण
संतुलनासाठी प्रत्येक घरामध्ये किमान पाच वृक्ष लागवड करणे 5 स्टार (Five Star)
स्मार्ट सिटीझन प्रोत्साहन मानांकन संकल्पनेमध्ये नागरिकांसाठी एक स्टार देवून सन्मानित
करण्याचे ठरविण्यात आलेले आहे. या संकल्पना राबविणाऱ्या नागरिकांचा सन्मान करणे,
या संकल्पनेत सहभागी होणारे नागरिकांना विशिष्ट मदतीकरिता संबंधित विभागाचे विभाग
प्रमुख हे सहकार्य करतील. तसेच त्यांच्या मदतीकरिता विविध संघटना, बचत गट,
स्वंयसेवी संस्था/ संघटना, व्हॉट्स अप ग्रुप मित्रमंडळ इत्यादी सहाय्यता मिळवून
देण्यात येईल. नागरिकांच्या सन्मानार्थ त्यांच्या घरावर दर्शन ठिकाणी स्थानिक
स्वराज्य संस्थेमार्फत प्रमाणिकरण 5 स्टार (Five Star) स्मार्ट सिटीझन बोर्ड
लावणे. विविध करांमध्ये संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मान्येतेने सवलत
देणे.
जनजागृती व प्रसार
शहरात घरोघरी
घडिपत्रिका वाटप, दर्शनी व मोक्याच्या ठिकाणी एल.ई.डी. पॅनलद्वारे व डिजीटल
बॅनरद्वारे प्रसिध्दी, स्थानिक केबलद्वारे प्रसिध्दी, पदाधिकारी व कर्मचारी यांना
योजनेत सहभागी होण्ययास्तव बंधनकारक करणे, शहरातील विविध सेवाभावी / स्वंयसेवी
संस्थांना यात सहभागी करुन त्यांच्यामार्फत जनजागृती करणे व ही संकल्पना
कार्यान्वीत करणे, सोशल मिडियाचा वापर करणे या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.
Comments
Post a Comment