पाल्यांना लागणारे विविध प्रमाणपत्र आपल्या गावांतील / विभागातील महा-ई- सेवा केंद्रातून उपलब्ध् करुन घ्यावी -तहसिलदार स्वप्नील पवार
पाल्यांना लागणारे विविध प्रमाणपत्र आपल्या
गावांतील / विभागातील महा-ई- सेवा केंद्रातून उपलब्ध् करुन
घ्यावी
-तहसिलदार स्वप्नील पवार
लातूर,दि.25 (जिमाका):-लातूर तालुक्यातील
सर्व सामान्य नागरीकांनी आपल्या पाल्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी लागणारे विविध प्रमाणपत्र
माहे एप्रिल2022 पासुन आपल्या गावातील / विभागातील महा-ई- सेवा केद्र यांच्याकडे दाखल
करुन विहित कालावधीत उपलब्ध् करुन घ्यावे असे असल्याचे
तहसिलदार स्वप्नील पवार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
सद्या तहसिल कार्यालयात कार्यरत असलेले
सेतुसुविधा केंद्र बंद असल्यामुळे लातूर शहरातील
एकूण 18 व लातूर ग्रामीण भागात एकूण 72 महा-ई- सेवा केंद्र व आपले सरकार पोर्टल कार्यरत
आहे. तसेच सि.एस.सी केंद्र कार्यरत आहेत. लातूर शहरात पुढील प्रमाणे महा-ई-सेवा केंद्र
कार्यरत आहेत. लातूर तालुक्यातील सर्व महा-ई- सेवा केंद्र, आपले सरकार या केंद्रावर
संजय गांधी / इंदीरा गांधी / श्रावणबाळ योजनेचे फॉर्म सादर करणे करीता सुविधा उपलब्ध्
करुन देण्यात आलेली आहे. त्याचा लाभ लातूर तालुक्यातील सर्व जनतेने घ्यावा.
श्री.सुधाकर
दगडु सोनवणे, बसवेश्वर
कॉलेज जवळ, लातूर मो.क्र.9765638014, श्री.जाधव राजेश्वर लिंबराज, कातपुर
रोड लातूर मो.क्र.9405735891, श्री.सोनवणे गणेश , श्रीनगर,
सोलकंर चौक, लातूर मो.क्र. 9765638064, श्री.स्वामी नागराज रमाकांत, विवेकांनद चौक, नाथ नगर, टि.व्ही.एस.शोरूम च्या बाजुला, मो.क्र. 9790015887, श्री.वानकुइकवाड दत्तात्रय, विवेकांनद चौक, बाभळगाव रोड, लातूर मो.क्र.
9545005323, श्री.जोगदंड राजाभाऊ , अंबाजोगाई रोड ,
शामनगर, लातूर मो.क्र. 9766268503, श्री.लहाडे दिपक उत्तम ,खाडगाव रोड, लातूर मो.क्र. 9420872220, श्री.तलवारे विशाल, सुभेदार रामजी नगर, लातूर मो.क्र. 9890439729,
श्री.देवकते रविकुमार रामकिशन, पंचायत समीती लातूर, मो.क्र. 9096686771, श्री.तांबोळी फिरोज मुनिर, संभाजी नगर, लातूर मो.क्र. 7755952279, श्री.सोनवणे ज्ञानेश्वर व्यकंटराव,
बार्शी रोड, लातूर
मो.क्र. 9330701695, श्री.काटे अदिनाथ बालासाहेब श्रीनगर, (आर्वी) बार्शी रोड, लातूर मो.क्र. 8446557114,
श्री.रंगनाथ बंडगर, पंचायत समीतीच्या पाठी मागे, लातूर
9881688537, श्रीमती. छाया बंडगर, खंडक हानुमान लातूर मो.क्र 9130085745 आहे.
माहे एप्रील 2022
पासुन नविन शैक्षणीक वर्षाला सुरूवात होत आहे. त्या अनुषंगाने विदयार्थ्याला उत्पन्नाचे
प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र , नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र,
वय अधिवास प्रमाणपत्र, ई-डब्लयु
एस.प्रमाणपत्र , शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, भुमीहीन प्रमाणपत्र इत्यादी विविध प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.या
प्रमाणपत्रासाठी जुन /जुलै मध्ये मोठया प्रमाणात तहसिल कार्यालयात गर्दी होते.
त्यामुळे संबधित विदयार्थ्यांना मोठया प्रमाणात आडचणी निर्माण होतात.
0000
Comments
Post a Comment