कला पथकाच्या माध्यमातून शासनाच्या योजना

सर्वसामान्यापर्यंत ; गावोगावी उत्तम प्रतिसाद

        लातूर दि. 13  ( जिमाका ) लातूर, औसा, देवणी, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, चाकूर तालुक्यातील मोठ्या आणि बाजारपेठाच्या गावात शासनाच्या योजना शाहिरी, गण गवळण, बतावणी आणि गीताच्या माध्यमातून सादर करतायत त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला... आता निलंगा, उदगीर, जळकोट, अहमदपूर तालुक्यात पुढच्या काही दिवसात कार्यक्रम होतील.

            हे कला पथक या शासनाच्या काळात ज्या ज्या लोक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत ज्यात महिलांच्या विकास योजना, विद्यार्थी, शेतकऱ्यांच्या योजना... त्यांच्या भाषेत, गाण्यातून, ढोलकीचा ठेका धरून सांगतात , त्याला लोकं उत्तम प्रतिसाद देतात.

          काल औसा, देवणी, हेर, नळेगाव, आष्टा, घरणी येथे कार्यक्रम झाले लोक अगदी थांबून कार्यक्रम ऐकत होते. या बरोबर त्यांना या योजनाची पुस्तकं, घडी पुस्तिकाही वाटल्या जातात... त्यामुळे त्याचा उत्तम परिणाम होत असल्याचे चित्र या कार्यक्रमातून दिसत आहे.

           शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचाव्यात हाच उद्देशाला धरून जिल्हा माहिती कार्यालय, लातूर यांनी ह्या कला पथकाचा जागर 9 मार्च पासून सुरु झाला असून 17 मार्च पर्यंत सुरु राहणार आहे. तीन कला पथकाच्या माध्यमातून जिल्ह्यात हे कार्यक्रम होत आहेत.

 




                                                       0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत