शेतकऱ्यांनी प्रमुख पिकांच्या पाने व उती तपासणी करुन घेण्याचे आवाहन

 

शेतकऱ्यांनी प्रमुख पिकांच्या पाने व उती

तपासणी करुन घेण्याचे आवाहन

 

लातूर, दि.24 (जिमाका):- लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रमुख पिकांच्या पाने व उती तपासणी करुन घेण्याकरीता जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी नांदेड व परभणी या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक लातूर विभाग लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

मानव विकास आयुक्तालय, औरंगाबाद यांच्या मार्फत सन 2019-20 च्या निधीमधून लातूर विभागातील नांदेड जिल्ह्यात-1 परभणी जिल्ह्यात-2 व हिंगोली जिल्ह्यात -1 याप्रमाणे एकुण -4 पाने व उती तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वीत झालेल्या आहेत. या  प्रयोगशाळेमध्ये शेतकऱ्यांच्या शेतावरील फळे पूढील नमुद केलेल्या भाजीपाला व्यापारी पिके व इतर निर्यातक्षम पिकांचे पाने व उती तपासणी नमुन्याची तपासणी प्रशिक्षीत मनुष्यबळामार्फत करण्यात येत आहे.

अन्नधान्य पिके :- सोयाबीन, कापुस, मका, गहु, रब्बी ज्वारी, तुर, सुर्यफुल, हरभरा, तीळ, मुग, भुईमुग,उडीद, साळ, मोहरी ई. फळवर्गीय पिके :-अंबा, संत्रा, मोसंबी, लिंबु, पेरु, पपई,केळी, डाळींब, सिताफळ, द्राक्ष, चिकु ई.व्यापारी पिके :- हळद, आले ई. भाजीपाला पिके:- टोमॅटो, मिरची, वांगी, भेंडी, कांदा, टरबुज, खरबुज, वेलवर्गीय भाज्या , कोबीवर्गीय भाज्या ई.

या प्रयोगशाळेमध्ये नत्र (N), स्फुरद (P), पालाश (K),सल्फर (S), कॅलशियम (Ca), मॅग्नेशियम (Mg), मॅग्नेशियम (Mg), बॉरॉन (B),लोह (Fe), मॅगनीज (Mn), झिंक (Zn), या 11 अन्नघटकांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुसार तपासणी अहवालामध्ये कृषि विद्यापीठाच्या शिफारसीप्रमाणे रासायनिक खतांच्या मात्रा ग्रेड-1, ग्रेड-2 फवारणीव्दारे सिंचणाव्दारे देणेबाबत शिफारस करण्यात येणार आहे. पाने व उती तपासणी प्रयोगशाळेत 11 अन्नघटक तपासणीकरीता 1100 रुपये शुल्क अदा करणे आवश्यक आहे असे ही पत्रकात नमुद केले आहे.

                                       0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत