औसा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. मंगेश पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू समजून न्यायिक कार्य करणे गरजचे -मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. मंगेश पाटील यांचे प्रतिपादन

 

औसा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे

मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. मंगेश पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

 

सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू समजून न्यायिक कार्य करणे गरजचे

-मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. मंगेश पाटील यांचे प्रतिपादन

  

लातूर दि.13 ( जिमाका ):-  औसा न्यायालयासाठी शक्य तितके प्रशासनिक सहकार्य करण्याबाबत आश्वस्त करुन सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून न्यायिक कार्य करणे गरजेचे असल्याचे असे मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. मंगेश पाटील यांनी प्रतिपादन केले. आज औसा येथील नुतन ुूकार्पण ‍ करणाच्या सचिया संश ‍दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांच्या नवीन न्यायालयीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. न्यायमुर्ती मंगेश पाटील यांच्या पत्नी सौ.संगिताताई पाटील यांचीही यावेळी उपस्थिती होती. 

यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुरेखा कोसमकर, न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश प्रसाद कोळेकर, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., तहसीलदार भरत सुर्यवंशी, जिल्हा विधी प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती अवसेकर, सह-जिल्हा न्यायाधिश गुजराथी, औसा न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश प्रसाद कोळेकर, सह- न्यायाधिश श्रीमती प्राची कुलकर्णी,  गटविकास अधिकारी सुर्यकांत भुजबळ, लातूर जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अॅड. श्रीधर व्ही. जाधव यांची उपस्थिती होती.   

प्रास्ताविकपर मनोगत मांडतांना अॅड. श्रीधर जाधव यांनी प्रलंबित असलेल्या वरिष्ठ न्यायालयासह इतर अनेक विषयावर लक्ष वेधत, विधि व न्याय विभाग तथा प्रशासकीय पातळीवर औसासाठी मदत तथा उपकृत करणे बाबत विनंती केली. कार्यक्रमाचे सुत्र संचलन अॅड. फिरोजखान पठाण व अॅड. शाहनवाज यांनी केले तर अॅड.अजिंक्य फत्तेपूरकर यांनी आभार मानले.








Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत