जिल्ह्यातून एकल कलावंताचे 3 हजार 40 प्रस्ताव प्राप्त, 552 प्रस्ताव पात्र, तर 2 हजार 488 प्रस्ताव अपात्र

 

जिल्ह्यातून एकल कलावंताचे 3 हजार 40 प्रस्ताव प्राप्त,

552 प्रस्ताव पात्र, तर 2 हजार 488 प्रस्ताव अपात्र

लातूर दि.15 (जिमाका) :- एकल कलावंत निवड समितीकडुन प्राप्त झालेल्या एकल कलावंताचे जिल्ह्यातून दि. 11 मार्च 2022 अखेरपर्यंत एकुण प्राप्त झालेल्या 3 हजार 40 प्रस्तावापैकी 552 प्रस्ताव पात्र व 2 हजार 488 प्रस्ताव अपात्र ठरले. छाननी समितीकडून अपात्र ठरविण्यात आलेल्या कलावंताचे प्रस्ताव संबंधित तहसिलदार यांच्या कार्यालयाकडे आवश्यक ते किमान कलेचे सक्षम पुरावे सादर करुन पंधरा दिवसात कार्यवाही करण्याबाबतची सुचना जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, लातूर यांना देण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभु जाधव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमीतकर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी भानु दौलताबादे, सहा. आयुक्त महानगरपालिका सौ. मंजुशा गुरमे, जिल्हास्तरीय वृध्द कलावंत निवड समितीचे अध्यक्ष लालासाहेब देशमुख व इतर कर्मचारी ही यावेळी बैठकीस उपस्थित होते.                                                   

0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु