भूमी अभिलेख पात्र उमेदवारांनी छाननी अर्ज भरण्याचे आवाहन

 

भूमी अभिलेख पात्र उमेदवारांनी छाननी अर्ज भरण्याचे आवाहन

 

            लातूर,दि.10 ( जिमाका ):- भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 ( भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहीत अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा विभागाच्या https://landrecordsrecruitment2021.in https://mahabhumi.gov.in  या संकेतस्थळावर दि. 9 डिसेंबर, 2021 ते  दि. 31 डिसेंबर 2021 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली होती.

               त्यानुसार दिनांक 31 डिसेंबर, 2021 अखेर ऑनलाईन स्वरुपात स्विकारण्यात आलेल्या एकूण 76 हजार 379 अर्जांचा डाटा विभागाकडे प्राप्त झालेला आहे. या डाटाची छाननी केल्यानंतर शैक्षणिक अर्हता धारण करित नसलेल्या उमेदवारांनी अर्ज भरल्याचे दिसून आले. त्याचबरोबर एकाच विभागातून एकच अर्ज भरणे आवश्यक असताना, काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे आढळले आहे. तसेच छायाचित्र व स्वाक्षरी देखील चुकीच्या पध्दतीने अपलोड केल्याचे दिसून आले आहे.

               या कारणांस्तव विभागाने ऑनलाईन अर्ज स्विकृतीव्दारे प्राप्त अर्जामधून अर्हता धारण करणारे व पात्र उमेदवार निवडीकरिता छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्याचे ठरविले आहे. त्याबाबतच्या  सविस्तर सुचना विभागाच्या https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.

               छाननी अर्ज केवळ दि. 9 डिसेंबर, 2021 ते 31 डिसेंबर, 2021 या कालावधीत अर्ज भरलेल्या उमेदवारांनाच भरता येतील. या उमेदवारांनी आपले विहीत शैक्षणिक अर्हता धारण करित असल्याचे प्रमाणपत्र छाननी अर्जामध्ये अपलेाड करावयाचे आहे. तसेच जे उमेदवार विहीत शैक्षणिक अर्हता धारण करणार नाहीत, अशा उमेदवारांना परिक्षेस बसण्यास अपात्र ठरविण्यात येवून ही छाननी अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात योग्य ती माहिती भरल्यानंतर त्यांच्या सदर अधिकृत बँक खात्यामध्ये भरलेल्या शुल्काचा परतावा करण्यात येणार आहे. याबाबत सर्व उमेदवारांनी सहकार्य करावे, अशी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य), पुणे यांच्यामार्फत सुचना करण्यात येत आहे, असे जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु