कृषि महाविद्यालयातील रक्तदान शिबिरात विक्रमी रक्त संकलन

 

कृषि महाविद्यालयातील रक्तदान शिबिरात विक्रमी रक्त संकलन

 

 

 लातूर,दि.8(जिमाका):-जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानार्थ आणि  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे (परभणी)  सुवर्ण "महोत्सवी वर्ष" भारतीय स्वातंत्राचा अमृत महोत्सवाचे" औचित्य साधून व सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून, दि.07 मार्च, 2022 रोजी लातूर येथील कृषि महाविद्यालयातील जिमखाना, राष्ट्रीय सेवा योजना आणि स्व.विलासरावजी देशमुख शासकीय वैद्यकीय संस्था,लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे  आयोजन करण्यात आले. 

           या रक्तदान शिबिराचे उदघाटन सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य, डॉ. ए. पी.सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले.या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.ए.एस.कारले, डॉ.बी.एस.इंदुलकर, डॉ.व्ही.एन.टोपरोपे, डॉ.व्यंकट जगताप व जिमखाना उपाध्यक्षा डॉ.ज्योती देशमुख, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रमाधीकारी डॉ.डी.डी.सुरडकर यांच्यासह या महाविद्यालयातील सर्व  प्राध्यापक ,कर्मचारी,अधिकारी आणि सर्व पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी - विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

            सद्या समस्त मानवाचे दैनंदिन जगणे धावपळीचे व अनिश्‍चित झालेले आहे. जागतिक स्तरावरील मानव निर्मित व नैसर्गिक संकटांच्या दुष्‍टचक्रात आपण भरडले जातोय आणि आता मानवाला त्याच्या अस्तित्वाची   शाश्वती  राहीलेली नाही. म्हणूनच, जीवात-जीव असेपर्यंत दातृत्वाच्या भावनेने सर्वश्रेष्‍ठ असे दान "रक्तदान" करण्याचे आवाहन केले. नैसर्गिक रक्ताला अजुनतरी कुठलाच कृत्रिम रक्ताचा पर्याय उपलब्ध नाही, त्यामुळे रक्तदान करून एखाद्याचे प्राण वाचविण्याचे सत्कर्म उपस्थित सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनींनी व कर्मचाऱ्यांनी करावे अशी विनंती केली.

रक्ताचा प्रत्येक थेंब न थेंब मनुष्याकरता वरदान आहे, त्यामुळे सर्वांनी रक्तदान करावे असे आवाहन डॉ. डी.डी.सुरडकर यांनी  करून रक्तदानाचे महत्व विषद केले. या रक्तदान शिबिरात कृषि महाविद्यालयातील बहुतांश  प्राध्यापक, कर्मचारी, अधिकारी  आणि सर्व पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी - विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून 100 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले. भविष्य काळात देखील अशा रक्तदान शिबिराचे  वेळोवेळी आयोजन करण्याचा संकल्प  सर्वांनी केला.

           या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन विद्यार्थी कु. सुरेश बांदुरकार यांनी  मौका दिजिए अपणे खून को, किसी की रगों मे बहने का | यह लाजवाब तरिका है, कई जिस्मो मे जिंदा रहने का || या काव्यपंक्ति उदृक्त करून त्याद्वारे  रक्तदानाचे महत्व पटवून दिले सेच डॉ.डी.डी.सुरडकर यांनी उपस्थितांचे व स्व.विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संस्थेच्या तज्ञ डॉक्टरांचे, तंत्रज्ञांचे व पथकातील सर्वांचे ऋण व्यक्त करून  शिबिराची यशस्वीरित्या सांगता झाली.

0000

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु