18 महा ई सेवा केंद्रानी प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज भरावेत -पालकमंत्री अमित देशमुख

 

18 महा ई सेवा केंद्रानी

प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज भरावेत

                                       -पालकमंत्री अमित देशमुख

लातूर, (जिमाका) दि.18:-  महा ई सेवा केंद्र 18 सुरु आहेत ते पूर्ण क्षमेतनी सुरु करुन संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज महा ई सेवा केंद्राकडे अर्ज स्विकारले जावेत, यासाठी तहसीलदारांनी तात्काळ परिपत्रक काढावे. तसेच तहसीलदारांनी सर्व सभासदांची मिटींग घेवून सर्व अडचणी जाणून घ्याव्यात. वार्ड क्र. 1 व 15 यामध्ये समाधान शिबीर घेण्यात आले आहे. ऑफलाईन पध्दतीने लवकरात-लवकर सर्व अर्ज परिपूर्ण करुन अर्ज घ्यावेत. तसेच 18 महा ई सेवा केंद्राला आदेश द्यावेत हे काम प्राधान्याने करावे, असे निर्देश  पालकमंत्री अमित देशमुख यांनी बैठकीत दिले.  

संजय गांधी निराधार योजनेचा आढावा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निजी कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपविभागीय अधिकारी सुनिल यादव, तहसीलदार स्वप्नील पवार तसेच संबंधित विभागाच्या विभाग प्रमुख व संजय गांधी निराधार समितीचे सर्व पदाधिकारी यांची  उपस्थिती होती.   

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत