अल्पसंख्याक समाजाच्या 100 मुलींसाठीच्या वसतीगृहाचे लातूर मध्ये लोकार्पण लातूर मोठं शैक्षणिक केंद्र झाले आहे त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना वसतीगृहाच्या सोयी अपुऱ्या, अधिक सोयी उपलब्ध करून देऊ -सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
अल्पसंख्याक समाजाच्या
100 मुलींसाठीच्या वसतीगृहाचे लातूर मध्ये लोकार्पण
लातूर मोठं शैक्षणिक
केंद्र झाले आहे त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना
वसतीगृहाच्या सोयी अपुऱ्या,
अधिक सोयी उपलब्ध करून देऊ
-सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
·
मराठवाड्यातील जिल्ह्याची विकासाची भूक
मोठी आहे ; न्याय देऊ
लातूर दि. 27 ( जिमाका ) :- लातूर आता शिक्षणाच्या
दृष्टीने मोठे केंद्र झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, वसतीगृह
अपुरे आहेत. आज अल्पसंख्याक समाजाच्या 100 मुलींसाठीचे हे वसतीगृह उत्तम बांधले आहे.
पण इथून पुढे अधिकाधिक मुलांच्या सुविधा असणारे वसतिगृह उभारण्याची गरज आहे, त्यादृष्टीने
प्रयत्न करावा अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विभागाला दिल्या.
पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतनच्या आवारात आज अल्पसंख्याक
समाजासाठीच्या 100 मुलींच्या वसतीगृहाचे त्यांच्या हस्ते लोकर्पण झाले त्यावेळी ते
बोलत होते.
यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा लातूरचे पालकमंत्री
अमित देशमुख, राज्याचे गृहनिर्माण तथा अल्पसंख्याक विभागाचे मंत्री जितेंद्र आव्हाड
( दूरदृष्य प्रणाली द्वारे हजर ), माजी मंत्री
दिलीपराव देशमुख, सहकार, कृषी व अल्पसंख्याक विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, पाणी पुरवठा
व स्वच्छता, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, आ. धीरज देशमुख, आ. विक्रम काळे, आ.
अमर राजूरकर ,महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी आ. हणमंत बेटमुगरेकर, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, आयुक्त अमन मित्तल उपस्थित होते.
लातूर मध्ये
अल्पसंख्याक समाजाच्या मुलींसाठी आज ज्या वसतिगृहाचे लोकार्पण झाले आहे, त्याला
जवळपास चार कोटी एवढा खर्च आला असून लातूर शैक्षणिक केंद्र झाल्यामुळे विद्यार्थ्यांची
संख्या मोठी आहे. त्या दृष्टीने वसतीगृह अपुरे आहेत. त्यासाठी आणखी उत्तम डिझाईन तयार
करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था कशी करता येईल असे नियोजन सार्वजनिक
बांधकाम विभागाकडून केले जावे अशा सूचना देऊन लातूरच्या विकासाठी निधी कमी पडू दिला
जाणार नसल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. मराठवाड्याची
विकासाची भूक मोठी आहे त्यामुळे त्याकडे न्याय दृष्टीने बघण्याची भूमिका सरकारची आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बाबतीत सकारात्मक असल्याचेही चव्हाण यांनी यावेळी बोलून
दाखविले.
अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी जे जे करता
येईल ते आपण करु, येत्या काळात गरीबांच्या मुलांना शिक्षणाच्या योग्य वाटा दाखविण्यासाठी
अल्पसंख्याक विभागाचा मंत्री म्हणून अभ्यासगट नेमणार असल्याची माहिती गृहनिर्माण तथा
अल्पसंख्यांक मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दूरदृष्य प्रणाली द्वारे बोलतांना दिली.
अल्पसंख्याक समाजाच्या 100 मुलींसाठीचे वसतिगृह
एक वर्षांपूर्वीच बांधून तयार झाले होते मात्र कोविडच्या काळामुळे त्याच्या उदघाटनाला
विलंब झाल्याचे सांगून अल्पसंख्य समाजाच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याची
भावना लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली.
युनानी कॉलेजसाठी प्रयत्न
या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून
वैद्यकीय शिक्षणाच्या वेगवेगळया अभ्यास शाखा लातूर मध्ये नाहीत त्या आणण्याचा आपला
प्रयत्न असून येत्या काळात वैद्यकीय शिक्षणाची एक शाखा असलेल्या युनानी शाखा इथे आणू
अशी ग्वाही पालकमंत्री अमित देशमुख यांनी
यावेळी दिली.
लातूर शहरात यापूर्वी एक शादीखाना झाला असून
दुसरा शादीखाना होणार आहे, हे सरकार निधीची कमतरता पडू देणार नाही असे सांगून नांदेडच्या
धर्तीवर लातूर मध्येही उर्दू घर बनविणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
तसेच अल्पसंख्याक समाजाच्या मुलीचे वसतिगृह झाले आता मुलाच्या वसतीगृहाच्या इमारतीचे
उदघाटन ऑगस्ट मध्ये होणार असल्याची माहितीही दिली.
अल्पसंख्याक समाजासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात
कामं हाती घेतली असून मागचे दोन वर्षे कोविड मध्ये गेले, त्याकाळात लोकांच्या आरोग्याची
सुरक्षितता ही सरकारची प्राथमिकता होती. आता भौतिक सुविधेसाठी आम्ही कामं हाती घेतली
असल्याचे सांगून अल्पसंख्याकांच्या विकासासाठी आम्ही काही नव्याने धोरण आखत असल्याची
माहिती राज्याचे सहकार, कृषी आणि अल्पसंख्याक विभागाचे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी
दिली.
****
Comments
Post a Comment