पालकमंत्री अमित देशमुख यांचा लातूर जिल्हा दौरा
पालकमंत्री अमित देशमुख यांचा लातूर जिल्हा दौरा
*लातूर,दि.26(जिमाका):-* राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांचा दिनांक 27 मार्च, 2022 रोजी लातूर
जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार,
दिनांक 27 मार्च, 2022 रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक
चव्हाण यांच्या समवेत विविध कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.30
वाजता खरोळा ता. रेणापूर येथील लातूर जिल्ह्यातील लातूर ग्रामीण मतदार संघातील विविध
विकास कामांचे भूमिपूजन समारंभास उपस्थिती. दुपारी 12.15 वाजता सार्वजनिक बांधकाम भवन,
औसा रोड, लातूर येथील नव निर्मित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, लातूर या
कार्यालयाचा लोकार्पण सोहळा व 34 रस्ते व पूल कामाचे भूमिपूजन समारंभास उपस्थिती.
दुपारी
12.30 वाजता औसा रोड येथील अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलीकरीता वसतिगृहाचे
लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 ते 2 या वेळेत दिलीपराव देशमुख यांच्या आशियाना
या निवासस्थानी राखीव. सायंकाळी 6.30 वाजता पटेल चौक लातूर येथे आमदार फंडा मधून लातूर
महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या विविध पिकास कामाचा भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.
******
Comments
Post a Comment