रोटरी क्लब ऑफ लातूर मीडटाऊन अंतर्गत येत्या 13 मार्च रोजी सायक्लोथॉन-2022

 

रोटरी क्लब ऑफ लातूर मीडटाऊन अंतर्गत

येत्या 13 मार्च रोजी सायक्लोथॉन-2022

 

        लातूर,दि. 11(जिमाका):- रोटरी क्लब ऑफ लातूर मीडटाऊनतंर्गत आयोजित सायक्लोथॉन 2022 कार्यक्रम दिनांक 13 मार्च 2022 रोजी डाव्या बाजूचा रोड बिडवे लॉन्स लातूर- राजीव गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, पिंपळ फाटा- कुंभारी (रेणापूर रोड 25 कि.मी.) अंतर रस्ता सकाळी 06.30 ते 10.30 वाजता या कालावधीत सायक्लींगसाठी  बंद करणेबाबतचे  मोठया प्रमाणात जनतेतून मागणी होत असल्याने मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 नुसार प्रदान अधिकारान्वये नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सायक्लोथॉन-2022 सायक्लींगसाठी डाव्या बाजूचा रोड बिडवे लॉन्स लातूर,  राजीव गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक , अहिल्यादेवी होळकर चौक- पिंपळ फाटा- कुंभारी (रेणापूर रोड 25 कि.मी.) अंतर रस्ता दिनांक 13 मार्च 2022 रोजी  सकाळी 06.30 ते 10.30 वाजता या कालावधीत इतर सर्व चारचाकी व जड वाहनास प्रतिबंधीत करुन पुढील पर्यांयी मार्गावरुन अत्यावश्यक सेवेची वाहने व केवळ हलकी वाहने (LMV), वगळता उर्वरित सर्व जड वाहनास पूर्णपणे प्रतिबंध करणे आवश्यक आहे.

          जिल्हादंडाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी लातूर मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 नुसार प्रदान अधिकारान्वये नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने रोटरी क्लब ऑफ लातूर मीडटाऊन आयोजित सायक्लोथॉन (सायक्लींगसाठी ) डाव्या बाजूचा रोड बिडवे लॉन्स लातूर- ,  राजीव गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक , अहिल्यादेवी होळकर चौक- पिंपळ फाटा- कुंभारी (रेणापूर रोड 25 कि.मी.) अंतर व परतीचा तोच रस्ता दिनांक 13 मार्च 2022 रोजी सकाळी 06.30 ते 10.30 वाजेपर्यंत इतर सर्व चारचाकी व जड वाहनास प्रतिबंधीत करुन पूढील पर्यायी मार्गावरुन केवळ हलकी वाहने (LMV), अत्यावश्यक सेवेची वाहने वगळता उर्वरित सर्व जड वाहनास पूर्णपणे प्रतिबंध करण्यात येत आहे.

प्रतिबंधीत करावयाचा मार्ग पूढील प्रमाणे आहे.- डाव्या बाजूचा रोड बिडवे लॉन्स लातूर,  राजीव गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक , अहिल्यादेवी होळकर चौक- पिंपळ फाटा- कुंभारी (रेणापूर रोड 25 कि.मी.) अंतर. पर्यायी मार्ग-  उजव्या बाजूचा रोड बिडवे लॉन्स लातूर,  राजीव गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक , अहिल्यादेवी होळकर चौक- पिंपळ फाटा- कुंभारी (रेणापूर रोड 25 कि.मी.) अंतर आहे.

या कालावधीमध्ये पोलीस विभागाने वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करावे . या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील असेही अधिसूचनेत नमुद केले आहे.

 

                                               0000

         

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत