पी.एम. किसान ॲपव्दारे ओटीपीव्दारे लाभार्थ्यांना स्वत: इकेवायसी (ekyc) प्रमाणिकरण मोफत 15 मार्चपुर्वी पूर्ण करावेत --- निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय नोडल अधिकारी
पी.एम. किसान ॲपव्दारे ओटीपीव्दारे लाभार्थ्यांना
स्वत: इकेवायसी (ekyc)
प्रमाणिकरण मोफत 15 मार्चपुर्वी पूर्ण करावेत
--- निवासी उपजिल्हाधिकारी
तथा जिल्हास्तरीय नोडल अधिकारी
लातूर दि.15
(जिमाका) :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील
सर्व पात्र लाभार्थ्यांना इकेवायसी ओटीपी (ekyc OTP) किंवा बायोमॅट्रीक प्रणालीव्दारे
करण्यासाठी पर्याय पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्यामध्ये संबंधित लाभार्थी
शेतकरी यांनी पी.एम. किसान योजनेचा https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील
फार्मर कॉर्नर (Farmer Corner) या टॅबमध्ये किंवा पी.एम. किसान ॲपव्दारे ओटीपीव्दारे लाभार्थ्यांना स्वत: इकेवायसी
(ekyc) प्रमाणिकरण मोफत करता येईल. तसेच ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) केंद्रावरती इकेवायसी
(ekyc) प्रमाणीकरण बायोमॅट्रीक पध्दतीने करता
येईल.
केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र
(CSC) केंद्रावर बायोमॅट्रीक पध्दतीने इकेवायसी (ekyc) प्रमाणिकरण करण्यासाठी प्रती
लाभार्थी प्रती बायोमॅट्रीकरण दर रुपये 15/- निश्चित करण्यात आला आहे. पी.एम. किसान
योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील एप्रिल- जुलै 2022 या कालावधीचा लाभ प्राप्त
होण्यापूर्वी इकेवायसी (ekyc) प्रमाणिकरणाची प्रक्रिया दि. 31 मार्च पुर्वी पुर्ण करणे
आवश्यक आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय नोडल अधिकारी, पी.एम. किसान
लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
000
Comments
Post a Comment