लातूरकरांना मोठा दिलासा … आज जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही, हे चित्र कायम राहावे यासाठी नागरिकांनी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे

 

लातूरकरांना मोठा दिलासा … आज जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही,

हे चित्र कायम राहावे यासाठी नागरिकांनी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे

                 -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचे आवाहन 

 

       लातूर दि.2(जिमाका):- मागच्या 24 तासात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात आढळून आलेला नाही. ही जिल्ह्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. पण आज एकही रुग्ण आढळून न येण्यामागे मोठ्या प्रमाणात झालेले लसीकरण आणि जिल्ह्यातील नागरिक करत असलेले कोविड-19 नियमांचे पालन आहे.  

        ज्या नागरिकांचे लसीकरण राहिले आहे, त्यांनी लसीकरण केंद्रावर जावून आपले लसीकरण करुन घ्यावे. अजूनही कोविड पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे कोविड -19 चे नियम पाळू या, अजूनही त्रिसुत्रीचे पालन करु या, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी लातूर जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे. 

 

0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत