“ जिल्हा रेशीम कार्यालय, लातूर कडुन रेशीम शेतकरी अभ्यास दौऱ्याचे आयोजन ”
“
जिल्हा रेशीम कार्यालय, लातूर कडुन रेशीम शेतकरी अभ्यास दौऱ्याचे आयोजन ”
लातूर,दि. 11(जिमाका):- जिल्हा
रेशीम कार्यालयाकडून मनरेगा तसेच पोकरा योजने अंतर्गत सन २०२१-२२ या वर्षात नवीन
तुती लागवड केलेल्या रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा
दोन दिवसीय अभ्यास दौरा, जिल्हा वार्षिक नियोजन योजने अंतर्गत आयोजित करण्यात आला आहे. सदर दौऱ्यामध्ये विविध भागातून ४४ लाभार्थी
तसेच रेशीम कर्मचारी समाविष्ट आहेत. या दौऱ्याला दिनांक ०८ मार्च २०२२ रोजी उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितिन वाघमारे तसेच रेशीम
विकास अधिकारी एस. बी. वराट यांनी हिरवा
झेंडा दाखवून दौऱ्यास
शुभेच्छा दिल्या.
या दौऱ्यामध्ये
दि. ०८ मार्च २०२२ रोजी मौजे चनई ता अंबाजोगाई व मौजे रुई ता गेवराई येथील प्रगतिशील रेशीम उत्पादक
शेतकऱ्यांना
भेटी देऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा
संवाद घडवून आणण्यात येणार आहे. या गावामध्ये मोठ्या प्रमाणात (प्रत्येक गावात
२५०-३०० एकर ) तुती लागवड असून बहुतांश शेतकरी हे
एका महिन्यात एका एकरवर रुपये १लक्ष उत्पादन घेत आहेत. सध्या रेशीम कोषास
प्रती क्विटल ७०-७५ हजारा पर्यन्त दर मिळत आहे.
दि. ०९ मार्च २०२२ रोजी बीड व जालना जिल्ह्यात
कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सुरू झालेल्या शासकीय कोष खरेदी मार्केटला भेट, जालना येथील ऑटोमॅटिक रेशीम धागा निर्मिती
प्रकल्प, औरंगाबाद येथील रेशीम फार्म वर लागवड केलेल्या
विविध तुती जातीची लागवड दाखवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील रेशीम उद्योगास चालना
मिळावी तसेच लातूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना कोष विक्रीस बीड व जालना येथील मार्केटला जावे लागते त्यांना
कोष मार्केटची माहिती तसेच कोष विक्रीस कोणतीही अडचण येऊ नये व जिल्ह्यात देखील
रेशीम धागा निर्मितीस चालना मिळावी या उद्येशाने या दौऱ्याचे आयोजन केलेले आहे.
जिल्ह्यात
सद्या ४०६ शेतकरी ४२५ एकर क्षेत्रावर रेशीम उद्योग करत असून कोषाचे दर प्रती
क्विटल ७०-७५ हजारा पर्यन्त दर मिळत असून वर्षात ३-४ पिके निघतात त्यामुळे १
एकरावर २-२.५ लक्षापर्यंत उत्पन्न मिळत असल्याने जिल्ह्यात रेशीम शेतीकडे शेतकऱ्याचा कल वाढत असल्याचे रेशीम विकास
अधिकारी यांनी नमुद केले. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितिन वाघमारे यांनी
रेशीम शेती ही अतिशय अल्प पाण्यावरील बहु-वार्षिक पीक असल्याने एकदा लागवड
केल्यानंतर १०-१५ वर्ष लागवडीचा खर्च येत नसल्याचे सांगितले तसेच वरील प्रमाणे
प्रती एकरी २-२.५ लक्षापर्यंत उत्पन्नाशिवाय मनरेगा अंतर्गत एक एकर तुती लागवड व
कोष उत्पादना करीता रु. ३.३२ लक्ष अनुदान
देय असल्याचे संगितले. त्याच प्रमाणे सदर दौऱ्यातील शेतकऱ्यांना
दौऱ्या नंतर
पाहणी केलेल्या प्रगतशील शेतकऱ्याप्रमाणे
जिल्ह्यात रेशीम कोषा पासून उत्पादन काढण्या
बाबत व गावातील इतर शेतकरी, मित्र यांना रेशीम उद्योग करण्यासाठी प्रवृत्त करणे बाबत मार्गदर्शन
करून सदर शेतकरी अभ्यास दौऱ्यास
शुभेच्छा दिल्या.
0000
Comments
Post a Comment