लातूर तालुक्यात एकल कलाकाराचे 93 अर्ज पात्र तर 127 अर्जामध्ये त्रुटी -तहसिलदार स्वप्नील पवार

 

लातूर तालुक्यात एकल कलाकाराचे

93 अर्ज पात्र तर 127 अर्जामध्ये त्रुटी

                                                        -तहसिलदार स्वप्नील पवार

*त्रुटीची पूर्तता पूढील पाच दिवसात सादर करावी

 

*लातूर, दि.28(जिमाका):-*लातूर तालुक्यातील कोरोना पार्शवभूमीवर कलाकारांना अर्थसहाय्य देण्या बाबत महाराष्ट्र शासन पर्यटन व संस्कृतीक कार्यविभागांच्या शासन निर्णयान्वये राज्यातील एकल कलाकार यांना 5000/- (पाच हजार रुपये) मानधन देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने लातूर तालूक्यात एकल कलाकाराचे 231 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी मंजूर 93 अर्ज हे पात्र असून 127 अर्जामध्ये त्रुटी आहेत.असे तहसीलदार स्वप्नील पवार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

सदरील त्रुटीतील अर्जाची यादी नोटीस बोर्डावर दिनांक 17 मार्च 2022 रोजी डकविण्यात आलेली आहे. सदर अर्जदारांना त्रुटीची पूर्तता पुढील 05 दिवसांमध्ये करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. लातूर तालुक्यातील एकल कलाकारांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी तहसील कार्यालयामध्ये हजर राहून नोटीस बोर्डावर लावलेल्या यादीची पाहणीकरुन आपले नाव त्रुटिच्या यादीमध्ये आहे याची खात्री करुन घेवून त्रुटीचे यादी मध्ये नाव असल्या पुढील 05 दिवसांमध्ये त्रुटीची पूर्तता सादर करावी असेही प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.

 

                                                    0000

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत