जागतिक श्रवण दिन उत्साहात साजरा

 

जागतिक श्रवण दिन उत्साहात साजरा

       लातूर,दि.4(जिमाका):-उमंग इन्स्टिट्यूट ऑफ ऑटीझम अँड मल्टीडिसेबिलिटी रिसर्च सेंटर, लातूर येथे जागतिक श्रवण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्रवण दिनाचे औचित्य साधून उमंग सेंटर येथे मोफत श्रवण तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी केले तर प्रमुख पाहूणे म्हणून दिव्यांग कल्याण विभागाचे प्रमुख राजू गायकवाड, सिध्दीविनायक प्रतिष्ठाणचे सचिव किरण उटगे, जिल्हा समन्वयक समग्र शिक्षाचे आनंद महानुरे उपस्थित होते.

           या शिबीरा दरम्यान श्रवण बाधित्व येण्यापुर्वीच्या चाचण्या उपलब्ध्‍ असून त्या चाचण्या करुन घेण्यात याव्यात तसेच 0 ते 6 वयोगटातील  लहान बालकांची चाचणी करुन दोष आढळल्यास उपचार करण्याच्या पध्दती सद्यस्थितीत उमंग सेंटरमध्ये उपलब्ध्‍ आहेत याचा लाभ लाभार्थ्यांनी घेण्याबाबत डॉ. अशिष कुमार, स्पिच थेरेपिस्ट यांनी माहिती दिली.

         कार्यक्रमाच्या शेवटी जागतिक श्रवण बाधित दिन श्रवण बाधित बालकांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. आशिष कुमार, डॉ. रवी शंकर आजाद, डॉ. निकिता फड, डॉ.राणी रोडगे, व्यवस्थापक श्रीहरी गोरे, माणिक करमले यांनी विशेष परिश्रम घेतले.

                                                      0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत