लातूरकरांसाठी लावणी महोत्सव 2022 मेजवाणी
लातूरकरांसाठी लावणी महोत्सव
2022 मेजवाणी
*आज पासून राज्यस्तरीय तीन दिवशीय लावणी महोत्सव -२०२२
*पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते होणार उदघाटन
लातूर,दि.25(जिमाका):-लातूर येथे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्यावतीने तीन दिवशीय लावणी
महोत्सव - २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे, लातूरच्या सांस्कृतिक क्षेत्र आणि कलारसीकांसाठी
एक पर्वणी असलेल्या या उपक्रमाचे उदघाटन महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक
कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते शनिवार, दि. २६ मार्च, 2022 रोजी सांयकाळी 6-30 वाजता उद्घाटन होणार
आहे.
यावर्षी लातूर येथे होणारा लावणी महोत्सव
शनिवार दि. २६ मार्च ते २८ मार्च २०२२ या कालावधीत लातूर येथील स्व. दगडोजीराव देशमुख
सांस्कृतिक सभागृह, कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर
जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अभिनव कल्पनेतून आता “ आजादी का अमृत महोत्सव” अतंर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम
व महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून लातूर येथे लावणी
महोत्सव - २०२२ चे तीन दिवसीय आयोजन करण्यात
आले आहे.
लोककलेच्या प्रातांत महाराष्ट्राची पारंपरिक लोककला लावणीला मानाचे स्थान असून
आजही मराठी माणसाला ही कला आपली वाटते. ग्रामीण भागातच नाही, तर शहरातही लावणीला फार
मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी आहे. ग्रामीण भागातील रसिक प्रेक्षकांचे आजही या कलेच्या
माध्यमातून मनोरंजन होत असते. या समृद्ध लोककलेला व लोककलावंतांना हक्काचे व्यासपीठ
मिळावे, यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
या तीन दिवशीय लावणी महोत्सवात शनिवार,
दि. २६ मार्च २०२२ रोजी सविता जळगावकर आणि पार्टी पुणे, न्यू अंबिका कलाकेंद्र आणि
पार्टी चौफुला, पुणे, पद्मावती कलाकेंद्र आणि पार्टी मोडनींब, सोलापूर ही संघ आपली
कला सादर करणार आहेत.
रविवार, दि. २७ मार्च २०२२ रोजी शीतल नागपूरकर
आणि पार्टी चौफुला, पुणे, आशा रूपा परभणीकर
आणि पार्टी मोडनीब सोलापूर, उषा रेश्मा नर्लेकर आणि पार्टी पुणे यांच्या बहारदार लावण्याचा
कार्यक्रम होणार आहे.
सोमवार, दि. २८ मार्च २०२२ रोजी नूतन कलाकेंद्र आणि पार्टी इस्लामपुर, नीता
काजल वडगावकार आणि पार्टी सणसवाडी पुणे, आशा वैशाली नगरकर आणि पार्टी मोडनीब यां संघाचा
लावणी कार्यक्रम असणार आहे. हा तीन दिवस असणारा लावणी महोत्सव रसिक प्रेक्षकांना विनामूल्य
असून जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याच्या
सांस्कृतीक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment