बाभळगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य शिबीराचा गरजुंनी लाभ घ्यावा -- बाभळगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक

 

बाभळगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील

   आरोग्य शिबीराचा गरजुंनी लाभ घ्यावा

-- बाभळगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक

          लातूर,दि.8(जिमाका):-  ग्रामीण रुग्णालय, बाभळगाव येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शिबीराचा सर्व गरजुंनी लाभ घ्यावे असे आवाहन बाभळगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांनी  एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले  आहे.

           दि. 12 मार्च 2022 रोजी मोतिबींदु तपासणी शिबीर, दि. 15 मार्च 2022 रोजी गरोदर मातांची तपासणी शिबीर, दिनांक 23 मार्च 2022 रोजी 6 ते 14 वयोगटातील बालकांचे दंत तपासणी शिबीर व 25 मार्च 2022 रोजी आयुष शिबीर (आयुर्वेदीक आणि होमिओपॅथीक) या सर्व ठिकाणी सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहेत.

                                                       0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत