गावागावात शासकीय योजनांचा कला पथकाच्या माध्यमातून जागर साहेब, ते शेळ्या हव्या आहेत हो, कशा मिळतील ते सांगा ...!!
गावागावात शासकीय योजनांचा कला पथकाच्या
माध्यमातून जागर
साहेब, ते शेळ्या हव्या आहेत हो,
कशा मिळतील ते सांगा ...!!
लातूर दि. 10 ( जिमाका ) कला पथकाने ढोलकीवर ताल दिला.. लोकं जमायला लागली, शाहिरांनी हुतात्म्याला वदंन करून कार्यक्रमात रंगत भरली...गावातला एक गावकरी आला, राम राम झाला... गावाकऱ्याने विचारले तुम्ही शासनाच्या योजना सांगताव, मला शेळ्या पाहिजेत काय करावं लागतंय... मी अल्पभूधारक शेतकरी हाव, काका तुम्हाला 10 शेळ्या आणि एक बोकड असा गट मिळतंय, काका विचारतात, त्यासाठी काय करावं लागतंय सांगा की, तो सांगतो, सेवा केंद्रावर जाऊन किंवा तुमच्या स्मार्ट फोनवरून पण करता येतं, ए एच महाबीम्स असं कॉम्पुटर मध्ये टाकायचं ते उघडतंय मग त्यात तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड, शेतीचा उतारा, अपत्य प्रमाणपत्र हे सगळं टाकायचं आणि पाठवून द्यायचं... ते जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाकडं जातंय... त्या यादीत तुमचा नंबर आला की तुम्हाला एक गट म्हणजे 10 शेळ्या आणि एक बोकड मिळतंय.. शासनाची ही नावीन्यपूर्ण योजना आहे...!!
हे सगळं ऐकून काका म्हणतात उद्याच जातो आणि भरतो फॉर्म. हे बतावणीतून कला पथक सादर करतं त्यामुळे ते थेट सर्व सामान्यांना कळतं... ढोलकीच्या तालावर गीतं श्रवणीय होतात मग लोक एकाग्र झाले की बतावणी होते, त्यात असे संवाद लोकांपर्यंत जातात... ही लोककलेची ताकत आहे.
काल रात्री शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उजेड मध्ये,
आज एरोळ, शिरूर अनंतपाळ, लातूर तालुक्यात रात्री साई,आर्वी, आज तांदुळजा मध्ये, रेणापूर
तालुक्यात रात्री खरोळा आज पळसी, पोहरेगाव मध्ये... असे कार्यक्रम झाले.
सकाळी आणि संध्याकाळी गावात आणि दुपारी बाजारपेठेच्या गावात या कला पथकाच्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिनस्त जिल्हा
माहिती कार्यालय, लातूर यांच्या वतीने जिल्ह्यात कला पथकाचे कार्यक्रम सुरु आहेत.
*****
Comments
Post a Comment