मांजरा प्रकल्प लाभक्षेत्रातील उन्हाळी हंगाम पाणी पाळया देण्यासाठी नियोजन

 

मांजरा प्रकल्प लाभक्षेत्रातील उन्हाळी हंगाम

पाणी पाळया देण्यासाठी नियोजन

*पाणी अर्ज 31 मार्च पूर्वी सादर करावेत

        लातूर, दि.24 (जिमाका):-मांजरा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सर्व वितरण प्रणाली, अधिसुचित नदी नाल्यावरील व कालव्यावरील प्रवाही व मंजूर उपसा सिंचन योजना धारकांसाठी, मांजरा प्रकल्पात या वर्षी 88.03 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून त्यानुसार उन्हाळी हंगामात 4 (चौथी पाणीपाळी राखीव) पाणी पाळया देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे उप कार्यकारी अभियंता लातूर पाटबंधारे विभाग क्र.1 लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 उन्हाळी हंगामाच्या नियोजनाबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतीक कार्य, पालकमंत्री, अमित देशमुख यांच्या  अध्यक्षतेखाली दि.18 मार्च 2022 रोजी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने  उन्हाळी हंगामातील इतर उभी पिके कालावधी (01 मार्च 2022 ते 30 जून 2022) या पिकासाठी कालव्याचे प्रवाही/ कालव्यावरील उपसा, नदिनाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनाद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना न.7, 7-अ मध्ये भरुन दिनांक 31 मार्च 2022 पुर्वी संबधीत शाखा कार्यालयास सादर करावेत.

पुर्व नियोजित पाणीपाळयाच्या अनुषंगाने लाभक्षेत्रातील सर्व लाभधारकांना सिंचनासाठी पाणी पाळी मिळाल्यास तदनंतर मिळणा-या पाण्याचा कालावधी हा साधारणत: 09 ते 10 दिवसापेक्षा जास्त असु शकतो त्यामुळे सदर कालावधीत तग धरुन राहु शकतील अशीच हंगामी पिके घेण्यात यावीत. निव्वळ कालव्याच्या पाण्यावर विसंबुन न राहता विहिर व बोरचा आधार असल्यासच जास्त पाण्याची गरज असणारे पिके (उदा: भुईमुग) घेण्यात यावे. अन्यथा होणा-या संभाव्य नुकसानीस  जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही याची नोंद घेवुन जलसंपदा विभागास सहकार्य करावे.

उन्हाळी हंगाम 2022 मधील कालव्याद्वारे पाणी आवर्तन नियोजनाचा तपशिल पूढील प्रमाणे उन्हाळी हंगाम 2021-22 दि. 23 मार्च 2022 ते 12 एप्रिल 2022, दि. 23 एप्रिल 2022 ते 13 मे 2022, दि. 23 मे 2022 ते 12 जून 2022 व दि. 23 जून 2022 ते 30 जून 2022 (राखीव पाणी पातळी) उन्हाळी हंगामातील पाणीपाळ्या चालू होण्याचा संभाव्य दिनांक या प्रमाणे राहील. तथापि पाऊस, कालवाफुटी व इतर अपरीहार्य कारणांमुळे वेळापत्रकात बदल होऊ शकतो.

प्रथम पाणी पाळी दि.23 मार्च 2022 ते 12 एप्रिल 2022 चे  गावनिहाय नियोजन प्रपत्र पूढील प्रमाणे  (मांजरा उजवा कालवा) तपशील,अपेक्षीत दिवस, अपेक्षीत सिंचन दिवस, चालू तारीख,बंद तारीख,गावांची नावे पूढील प्रमाणे आहे. मांजरा उजवा कालवा उन्हाळी हंगाम 2022 प्रथम पाणी पाळीकेसाठी दि.23 मार्च 2022 ते 26 एप्रिल 2022 पर्यंत कालव्याच्या शेवटच्या भागात पाणी पोहचण्यास लागणारा कालावधी - अपेक्षीत दिवस 4 अपेक्षीत सिंचन क्षेत्र -0 चालू तारीख 23 मार्च 2022 बंद तारीख 26 मार्च 2022,

मांजरा उजवा कालवा किमी 78 ते  CR no. 4 (किमी 58) अपेक्षीत दिवस 4 अपेक्षीत सिंचन क्षेत्र -600 चालू तारीख 27 मार्च 2022,बंद तारीख 30 मार्च 2022, नागझरी, जेवळी, भोईसमुद्रा, टाकळी, तांदळवाडी, सामनगाव, मांजरी. मांजरा उजवा कालवा CR no. 4 (किमी 58) ते CR No. 3 (किमी 40)   अपेक्षीत दिवस -4 अपेक्षित सिंचन क्षेत्र-800 चालू तारीख 31 मार्च 2022 बंद तारीख 3 एप्रिल 2022 काटगाव,कारसा,रुई रामेश्वर, दिंडेगाव, कासार जवळा, येळी ढोकी, जवळा. मांजरा उजवा कालवा CR no. 3 (किमी 40) ते CR No. 2 (किमी 25) अपेक्षीत दिवस -5 अपेक्षित सिंचन क्षेत्र-790 चालू तारीख 4 एप्रिल 2022 बंद तारीख 8 एप्रिल 2022 बोडका,वांजरखेडा,सारसा, गाधवड, मसला, पिंपळगाव, तांदुळजा. मांजरा उजवा कालवा CR no. 2 (किमी 25) ते  (किमी  0)  अपेक्षीत दिवस -4 अपेक्षित सिंचन क्षेत्र-780 चालू तारीख 9 एप्रिल 2022 बंद तारीख 12 एप्रिल 2022 टाकळगाव, कानडी बोरगाव, तटबोरगाव, रांजणी, लासरा, ताडगाव, वाकडी, घारगाव, सौंदना, आवाड शिरपुरा, शिराढोण, दाभा.एकूण अपेक्षित दिवस 21 अपेक्षित सिंचन क्षेत्र 3150

प्रथम पाणी पाळी दि.23 मार्च 2022 ते 12 एप्रिल 2022 चे  गावनिहाय नियोजन प्रपत्र पूलीलप्रमाणे (मांजरा डावा कालवा) मांजरा डावा कालवा उन्हाळी हंगाम 2022 प्रथम पाणी पाळीकेसाठी दि.19 मार्च 2022 ते 08 एप्रिल 2022 पर्यंत कालव्याच्या शेवटच्या भागात पाणी पोहचण्यास लागणारा कालावधी अपेक्षित दिवस -4 अपेक्षित सिंचन क्षेत्र -0 चालू तारीख 23 मार्च 2022 बंद तारीख 26 मार्च 2022 मांजरा डावा कालवा मिमी 90 ते CR no. 4 (किमी 70) अपेक्षित दिवस -4 अपेक्षित सिंचन क्षेत्र 600 चालु तारीख 27 मार्च 2022 बंद तारीख 30 मार्च 2022, महापूर, साई, आरजखेडा, बोरगाव, कोळगाव, निवाडा, सांगवी, सिंधगाव.

 मांजरा डावा कालवा CR no. 4 (किमी 70) ते CR No. 3 (किमी 49) अपेक्षित दिवस -4 अपेक्षित सिंचन क्षेत्र 790 चालु तारीख 31 मार्च 2022 बंद तारीख 3 एप्रिल 2022 सिंधगाव, शेरा, पोहरेगाव, डिगोळ, भोकरंबा, चाडगाव. मांजरा डावा कालवा CR no. 3 (किमी 49) ते CR No. 2 (किमी 18) अपेक्षित दिवस -5 अपेक्षित सिंचन क्षेत्र-880 चालु तारीख 4 एप्रिल 2022 बंद तारीख 8 एप्रिल 2022 सुगाव, मोटेगाव, धानोरा(बु.), वांगदरी, तडोळा, अकोला, देवळा, पाटोदा, अंजनपूर मांजरा डावा कालवा CR no. 2 (किमी 18) ते  (किमी  0)  अपेक्षित दिवस -4 अपेक्षित सिंचन क्षेत्र-880 चालु तारीख 9 एप्रिल 2022 बंद तारीख 12 एप्रिल 2022 अंजनपूर, कोपरा, धानोरा (खु), आपेगाव, इस्थळ, सौंदणा, नायगाव, आवाड शिरपुरा एकुण अपेक्षित 21 अपेक्षित सिंचन क्षेत्र 3150

सदयस्थितित  लातूर पाटबंधारे विभाग क्रं.1 लातूर अंतर्गत अत्यंत कमी प्रमाणात कर्मचारी असून प्रत्येक शाखा कार्यालयात केवळ 1 ते 2 कर्मचारी  कार्यरत आहेत. लाभधारकांनी त्यांनी स्वत: पुढाकार घेवून शाखेत येवून सिंचनासाठी पाणी मागणी करावी. तसेच ज्या ज्या ठिकाणी शक्य असल्यास शाखेतील कर्मचारी यांचेकडुन ग्रामपंचायत कार्यलयात प्रत्याक्षात येवून पाणी मागणी अर्ज उपलब्ध् करुन देण्याचे नियोजन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

अटी  व शर्ती  पूढील प्रमाणे आहेत  

  ज्या जमिनीसाठी पाणी मागणी  करावयाची आहे ती व्यक्ती जमिनीचा मालक असला पाहिजे. पाणी अर्जासोबत 7/12 उतारा सादर करावा. पाणी अर्जासोबत मागील थकबाकी पूर्ण भरावी व रितसर पावती घ्यावी. पाणी मागणी क्षेत्र 0. 20 आर च्या पटीत( कमित कमी 0.20 आर  क्षेत्र) असावे ,तसेच अर्जासोबत थकबाकी पाणीपट्टी भरल्यानंतर पाणी  अर्ज मंजुर करण्यात येईल. पाणी अर्ज मंजुर झाल्यानंतर पिकास पाणी घ्यावे. आपआपल्या हद्दीतिल शेतचारया दुरुस्तीची जबाबदारी संबधित बागायतदाराची राहील. शेतचारी नादुरुस्त असल्यास मंजुरी दिली जाणार नाही. व पाणी दिले जाणार नाही. मंजुरीपेक्षा जास्त क्षेत्र सिंचीत  केल्यास हंगांमी दराच्या  दिड्पट दराने आकारणी केली जाईल. पाणी अर्ज न देता पाणी घेतल्यास बिनअर्जी क्षेत्राचे पंचनामे करुन दंडनीय दराने आकारणी करण्यात येईल. 

कालव्यावरील उपसा सिंचन परवाना धारकाने त्यांचे मंजूर क्षेत्रास ठरवून दिलेल्या तारखेस पाणी कालव्याच्या शेवटपासून ते सुरवात (Tail to Head)  या प्रमाणे घ्यावे.सिंचन नियोजन असल्यास मंजुर कालावधी सोडुन मॊटारी चालु ठेवल्यास सिंचन अधिनियम 1976 चे कलम 97 नुसार विद्युत पुरवठा खंडीत करणे,विद्युत मोटारी जप्त करणे,पाणीपरवाना रद्द करणे,व बिगर पाळी पंचनामा करणे अनिवार्य ठरेल याची नोंद  घ्यावी.  शासनाने वेळोवेळी प्रसिद्ध  केलेल्या प्रचलीत पाणीपट्टीच्या दराने आकारणी करण्यात येईल व त्यावर 20 टक्के  स्थानीक कर आकारला जाईल. नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा काही अपरिहार्य कारणामुळे अथवा तांत्रिक कारनास्तव पाणीपुरवठा शक्य न  झाल्यास व त्यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी या कार्यालयावर राहणार नाही .  तसेच कांही अपरिहार्य कारणास्तव / तांत्रीक अडचणी उदभ्वल्यास सदर जाहीर निवेदनाव्दारे देण्यात आलेल्या पाणी पाळीच्या नियोजनामध्ये  बदल करण्याचे हक्क सदर निम्ण स्वॉक्षरीतांनी राखुन ठेवलेले आहेत. उपसा सिंचन परवाना धारकांनी इतरांना पाणी दिल्यास व दिलेला सिंचन परवान्यावर  विदुत मोटार 5 एच पी पेक्षा जास्त विदुत मोटार एच पी आढळल्यास सिंचन परवाना  रद्द करण्यात येईल.

जबरदस्तीने अथवा विनापरवानगी गेट उघडल्यास,कालवा फोडून पाणी घेतल्यास  पाटबंधारे अधिनियम 1976 चे खंड क  पोटकलम क व ख अन्वये  दंडात्मक कायदेशीर कार्यवाही  करण्यात येईल.  पाटबंधारे विभागामार्फत जाहीर आवाहन करण्यात येते की, कालव्यावरील उपसा व ठिबक सिंचन पाणी परवाना धारकांचे पाणी अर्ज प्रथम प्राधाण्याने  मंजुर करुण एकपट दरानेच अकारणी करण्यात येईल तसेच ज्या लाभधारकांचे पाणी परवाने उपलब्ध नाहीत, त्या लाभधारकांस विना परवाना व अनाधिकृत पाणी उपसा समजुन संबधितास दिडपट दराने अकारणी करण्यात येईल. त्यामुळे कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त लाभधारकांनी पाणी परवाने घेवुनच सिंचनासाठी पाणी  घ्यावे  व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे. तसेच कालव्यामध्ये आढळून येणारी होज पाईप तात्काळ काढण्यात यावेत. तदनंतरही होज पाईप आढळून आल्यास संबंधीताविरोधात शासन निर्णयाप्रमाणे तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल याची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी व सहकार्य करावे असे ही पत्रकात नमुद केले आहे.

 

                                                     0000                                                                                                            

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत