दिव्यांग व्यक्तीना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करणेसाठी भरीव तरतुद करण्यात यावे

 

दिव्यांग व्यक्तीना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र

वाटप करणेसाठी भरीव तरतुद करण्यात यावे

लातूर, दि.24 (जिमाका):-दिव्यांग व्यक्तीना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्योग प्रमाण व बौधिक प्रमाणपत्र (ODD) देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष मोहीम राबविणे बाबतचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी नुकतीच  जिल्हाधिकारी सभागृहात बैठक घेण्यात आली. त्यावेळेस ते बोलत होते.या बैठकीस आयुक्त महानगरपालिका, अमन मित्तल, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रभु जाधव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सुनिल खमितकर, महिला व बाल कल्याण अधिकारी, देवदत्त गिरी, जिल्हा शल्य चिकिस्तसक, एस.एस. देशमुख, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व रुग्णालयाचे डॉ. लक्ष्मण  देशमुख    संवेदना संस्थेचे व्यंकट लांमजने इत्यादी अधिकारी बैठकीसाठी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये जिल्हा नियोजन समिती मधुन विशेष मोहिम राबविण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनदर्गत 5.00 लक्ष रुपये तरतुद करण्यात यावी. जि.प.5 टक्के राखीव निधी किंवा जिल्हा दिव्यांग कल्याण निधीमधुन रुपये 15.00 लक्ष तसेच म. न. पा. 5 टक्के, दिव्यांग राखीव निधीमधुन शहरी भागातील लाभार्यासाठी 300 लक्ष रुपये तरतुद करण्यात यावी, शिबीराचे प्रचार व प्रसार करण्यासाठी जि.प.5 टक्के राखीव निधी 1.00 लक्ष व म.न.पा. 5 टक्के राखीव  निधीमधुन 1.00 तरतुद करण्यात यावी.

या बैठकीमध्ये दिव्यांग व्यक्तीनी तालुकानिहाय लाभ घेण्यासाठी दर आठवडयाचा शुक्रवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातुर, दर आठवड्याचा बुधवार व शुक्रवार, सामान्य रुग्णालय उदगीर, दर आठवडयाचा बुधवार व शुक्रवार, उपजिल्हा रुग्णालय, निलंगा पहिला व तिसरा बुधवार, ग्रामीण रुग्णालय,अहमदपूर  पहिला व तिसरा शुक्रवार ग्रामीण रुग्णालय रेणापूर, चौथा बुधवार, ग्रामीण रुग्णालय,औसा चौथा शुक्रवार या प्रमाणे दिव्यांग लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे अवाहन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी केले.

महिला व बाल कल्याण विभागातंर्गत अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य विभागातंर्गत आशा वर्कर यांच्या मार्फत शिबीराचे प्रसार व प्रचार करणे तसेच शिबीराच्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना घेवून येण्यासाठी व्यवस्था करणे.तसेच हाऊस टू हॉस्पीटल अशी सेवा देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सुचना दिली. जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) जिल्हा परिषद यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील तसेच खाजगी शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना या मोहिमेदरम्यान UDID कार्ड मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, शिबीरांच्या ठिकाणी गरजेप्रमाणे त्या तालुक्यातील शिक्षक उपलब्ध्‍ करुन देणे असे निर्देश समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले.

 

                                            0000

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत