‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे 1 एप्रिल रोजी आयोजन विद्यार्थी - पालकांनी सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा
‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे
1 एप्रिल रोजी आयोजन
विद्यार्थी - पालकांनी सुवर्ण
संधीचा फायदा घ्यावा
*भारताचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार
लातूर दि.30(जिमाका):- 1 एप्रिल
2022 रोजी सकाळी 11 वाजता दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियम वर ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे
आयोजन भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने केले आहे. या कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी प्रसिध्दी
पत्रकाव्दारे कळविले आहे.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी परीक्षेचा
तान तनाव न घेता परीक्षा एखाद्या सण उत्सवाप्रमाणे आनंदाने द्यावी. कोविड मुळे प्रत्यक्ष
वर्गामध्ये अध्ययन अध्यापन न होता अंतरजालाच्या माध्यमातून झाले आहे.यामुळे अनेक विद्यार्थी
पालकांना या संदर्भात अडचणी किंवा गैरसमज असू शकतात. म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात
काही समस्या जाणवू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सालाबाद
प्रमाणे या वर्षीही मार्गदर्शन करणार आहेत.
यापुर्वी झालेल्या परीक्षा पे चर्चा या
कार्यक्रमाचा देश विदेशातील अनेक विद्यार्थी पालकांना याचा फार मोठा लाभ झालेला आहे,
हा कार्यक्रम दूरदर्शनवर दि. 1 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित करण्यात येणार
आहे.
लातूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक
व उच्च माध्यमिक, महाविद्यालय आणि व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थी,
पालक, त्यांचे नातेवाईक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी
यांनी या कार्यक्रमाचा आवश्य लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी ‘परीक्षा
पे चर्चा’ कार्यक्रमाचे लातूर जिल्ह्याचे नोडल ऑफिसर तथा जवाहर नवोदय विद्यालयाचे
प्राचार्य जी रमेश राव यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment