जिल्ह्यातील नागरिकांनी उन्हाळ्यात उघड्यावरील अन्न पदार्थ, बर्फ़ सेवनाबाबतीत काळजी घ्यावी

 

जिल्ह्यातील नागरिकांनी उन्हाळ्यात उघड्यावरील अन्न पदार्थ, बर्फ़ सेवनाबाबतीत काळजी घ्यावी

*अन्न व औषध प्रशासन लातूर यांचेकडून जनतेस आवाहन

लातूर,दि.25 (जिमाका):- जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहून आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्याचे व त्यानुषंगे योग्य अन्न पदार्थांचे सेवन करण्याबाबत जागरुक राहून उघड्यावरील अन्न पदार्थाचे सेवन करणे टाळावे तसेच अन्न व्यावसायिकाकडे खरेदी केलेल्या अन्न पदार्थाचे बील आग्रहाने घ्यावे असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन द.वि.पाटील यांनी केले आहे.

सध्या उन्हाळ्याचा चटका वाढत असून,या उन्हाळ्याच्या निमित्ताने नागरिकांमध्ये थंड अन्न पदार्थांच्या सेवनाचे व त्यानुषंगे बर्फ़ाच्या वापराचे प्रमाण वाढणार आहे. नागरिकांनी उघड्यावरील ज्युस सेंटर्स, बर्फ़ गोळा, आईस्क्रीम, रसवंती, कोल्ड्रिंक, कुल्फ़ी, मिल्कशेक व इतर शितपेयांची विक्री करणारे विक्रेते यांचेकडे अन्न व औषध प्रशासन कार्यालय लातूर यांचा परवाना/नोंदणी असल्याबाबत खातरजमा करावी. तसेच बर्फ़ाचे सेवन करण्यापुर्वी तो पिण्यायोग्य पाण्यापासून बनविला असल्याची खात्री करावी.

उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर सर्व अन्न व्यावसायिकांनी ग्राहकांना विक्री करावयाच्या अन्न पदार्थ विक्री करण्यापुर्वी ते शिळे नसल्याची खात्री करावी. विशेषत: दुध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणारे व्यावसायिकांनी खवा, रसमलाई, पनीर यासह इतर दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांना स्वच्छ व ताजे विक्री करावे. मांस विक्रेते यांनी त्यांचे ग्राहकास स्वच्छ व ताजे मटन विक्री करावी या बाबत हयगय होत असल्याचे आढळून आल्यास आवश्यक ती कायदेशिर कारवाई करण्यात येणार असल्याबाबत सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, लातूर यांनी सुचित केले आहे.

0000 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु