तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह मतदार नोंदणी करुन घ्यावी -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
तृतीय पंथीयांच्या
मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह
मतदार नोंदणी करुन
घ्यावी
-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
लातूर,दि.25 (जिमाका):- ३१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय
तृतीय पंथी ओळख दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. मुख्य निवडणूक अधिकारी यांचे
निर्देशानुसार या ओळख दिनाचे निमित्ताने दिनांक २७
मार्च ते २ एप्रिल २०२२ हा “तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह" म्हणून साजरा
करण्याचा निर्णय घेतला असल्याचे उपजिल्हा
निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
नोव्हेंबर २०२० मधील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण
कार्यक्रमांतर्गत तृतीय पंथीयांच्या नाव नोंदणीसाठी राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे
मतदार यादीतील त्यांची टक्केवारी वाढली असली, तरी लोकसंख्येतील
पात्र सर्व तृतीयपंथी नागरिकांची नोंदणी करणे लक्ष्यांक आहे. तरी, तृतीय पंथी ओळख दिनाच्या निमित्ताने त्यांच्या नाव नोंदणीसाठी प्रयत्न
केल्यास ही लक्ष्यापूर्ती करण्यास हातभार लागू शकणार आहे.
मुख्य निवडणूक
अधिकारी यांचे निर्देशानुसार लातूर जिल्हयात दिनांक २७ मार्च ते २ एप्रिल २०२२
या सप्ताहामध्ये प्रत्येक तहसील कार्यालयांतर्गत तृतीय पंथीय मतदार नाव नोंदणीसाठी
विशेष शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार तृतीय
पंथीयाच्या मतदार नाव नोंदणीसाठी त्यांच्या वैदयकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
याबाबतच्या सर्व सूचना मतदार नोंदणी अधिकारी, सहा. मतदार नोंदणी
अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना दिलेल्या आहेत.
लातूर जिल्ह्यातील तृतीय पंथीयांसाठी
कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था, व्यक्ती यांनी
तृतीयपंथी ओळख दिनाचे निमित्ताने राबवण्यात येणाऱ्या विशेष मतदार नोंदणी शिबिरात
सहभागी होऊन सर्व पात्र तृतीयपंथी नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी
संबंधित तालुक्याचे तहसील कार्यालयात संपर्क करावा व “तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह” अंतर्गत मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. व उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.
सुचिता शिंदे यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment